सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचा आर्थिक वर्ष 2021-22 मधील वार्षिक खर्च 2020-21 मधील सुधारित वार्षिक खर्चापेक्षा 28% जास्त आहेः आर. सुब्रह्मण्यम
Posted On:
04 FEB 2021 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या 2020-21 वर्षातील सुधारित खर्च आराखड्याच्या (8207.56 कोटी रुपये) तुलनेत 2021-22 वर्षातील तरतूद 10517.62 कोटी रुपये असून गेल्या वर्षीपेक्षा 28 टक्के अधिक आहे.
2021-22 दरम्यान विभागाच्या वार्षिक खर्च आराखड्यापैकी जवळपास 76 टक्के निधी राज्यांना केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत वितरित करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये सर्व मंत्रालयांसाठी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठीच्या तरतुदीत 2020-21 मधील 83,256 कोटी रुपयांच्या तुलनेत 51.65 टक्के वाढ करण्यात आली असून 1,26,259 कोटी रुपये केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागासाठी करण्यात आलेल्या तरतुदीबाबत माध्यमांना संबोधित करताना सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की नवीन आर्थिक वर्षात परिचालन, कार्यक्षमता, समन्वय आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित विद्यमान योजनांची पुनर्रचना करण्याची कल्पना करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ठळक मुद्द्यांसाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695166)
Visitor Counter : 289