कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
ओबीसी उमेदवारांसाठीच्या पदांवरील अनुशेष
Posted On:
04 FEB 2021 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
मंत्रालय/शासकीय विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका/आर्थिक संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी राखीव असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यातील प्रगतीवर कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DOPT) देखरेख ठेवते.
सर्व मंत्रालय विभाग/खाती यांना DoPT ने आरक्षित पदांच्या अनुशेषसंदर्भात सूचना दिल्या आहेत. खाती व विभागांना अंतर्गत समिती नेमून त्या समितीकडून आरक्षित पदांच्या अनुशेषाची गणती करून, असा अनुशेष राहण्याची मुख्य कारणे शोधून श्या प्रकारे आरक्षित पदांच्या अनुशेषाला कारणीभूत असणारे घटक काढून टाकण्याच्या व एखाद्या विशेष मोहिमेद्वारे या पदांवर भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सप्टेंबर 1993 मध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू झाले तेव्हापासून आरक्षित पदांवरील संख्या वाढती आहे. 53 मंत्रालय विभाग व खात्यांकडून आता उपलब्ध माहितीनुसार 01.01.2012 रोजी इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांची टक्केवारी 16.55 टक्के होती ती 01.01.2019 रोजी 20.46% झाली.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695148)
Visitor Counter : 183