गृह मंत्रालय

निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवरील लाठीहल्ला

Posted On: 03 FEB 2021 6:32PM by PIB Mumbai

 

भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टानुसार सार्वजनिक ठिकाणची सुव्यवस्था आणि पोलीस हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहेत. गुन्ह्यांचा तपास, नोंदणी, गुन्ह्यांची  फिर्याद, आरोपीची निश्चिती तसेच जीवित आणि मालमत्ता यांची सुरक्षितता यांच्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखणे ह्या प्रामुख्याने संबंधित राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत.

दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा विचार करता, सरकारने नुकत्याच अधिनियमित केलेल्या शेतकरी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी  ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये बसलेल्या निदर्शक शेतकऱ्यांच्या मोठ्या ताफ्याने त्वेषाने चाल करून जात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड हटवून दिल्लीत शिरण्यासाठी प्रयत्न केला अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.  त्यांनी आक्रमकपणे दंगे करण्याचा प्रयत्न केला, सरकारी मालमत्तेची हानी केली, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून अटकाव केला तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जखमीं केले. इतकेच नव्हे तर, कोविड–19 च्या महामारीच्या परिस्थितीत या शेतकरी आणि निदर्शकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत गर्दी केली, निदर्शने करताना  शारीरिक अंतर राखण्याचे नियम पाळले नाही तसेच कुणीही चेहेऱ्यावर मास्क घातला नाही. शेतकऱ्यांच्या कृतीमुळे निरुपाय होऊन जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांना अश्रूधुराचा, पाण्याच्या फवाऱ्याचा आणि सौम्य लाठीहल्ल्याचा वापर करावा लागला.  

गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

****

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1694850) Visitor Counter : 171