आयुष मंत्रालय

योग शिक्षणाला प्रोत्साहन

Posted On: 02 FEB 2021 8:07PM by PIB Mumbai

 

सध्या केंद्रीय स्तरावर योग शिक्षणासाठी कोणतेही नियमन नाही. तथापि, आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत नवी दिल्ली येथील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था ही स्वायत्त संस्था विविध योग शिक्षण कार्यक्रम आयोजित करते. कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे:

एमडीएनआयवाय, नवी दिल्लीतर्फे आयोजित योग शिक्षण कार्यक्रमांचा तपशील

 

S. No.

Name of the Programme/Course

Duration of the Programme/Course

1.

M.Sc. (Yoga)

2 Years

2.

B. Sc. (Yoga)

3 Years

3.

Post Graduate Diploma in Yoga Therapy for Medicos and Para Medicos (PGDYTMP)

1 Year

4.

Diploma in Yogic Science (DYSc.)

1 Year

5.

Certificate Course in Yoga for Wellness Instructor

6 months

6.

Certificate Course in Yoga for Protocol Instructor (CCYPI)

3 months

7.

Certificate Course in Yoga Science for Wellness

4 months

राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना (एनसीएफ) 2005 ने योग शिक्षणाला आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग करण्याची शिफारस केली. आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हा इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत अनिवार्य आणि इयत्ता अकरावी ते बारावीपर्यंत वैकल्पिक विषय आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) यापूर्वीच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या आरोग्य आणि शारीरिक शिक्षणावर एकात्मिक अभ्यासक्रम विकसित केला आहे.

राज्यमंत्री (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय)किरेन रीजीजू (अतिरिक्त प्रभार) यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1694563) Visitor Counter : 262