आयुष मंत्रालय

आयुष क्षेत्रातील उच्च-प्रभाव संस्था वाढवण्याच्या यशाबद्दल आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेची प्रशंसा

Posted On: 02 FEB 2021 7:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीच्या बाजार संशोधन व सामाजिक विकास केंद्राने (सीएमआरएसडी) आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेचे नुकतेच मूल्यांकन करून देशाच्या विविध भागात आयुष आधारित आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणार्‍या त्यांच्या अभिनव व सर्जनशील प्रकल्पांसाठी या योजनेची प्रशंसा केली आहे.

आयुष मंत्रालयाच्या उत्कृष्टता केंद्र योजनेंतर्गत नामांकित आयुष संस्थांना त्यांचे कार्य आणि सुविधा उत्कृष्टतेच्या पातळीवर सुधारित करण्यासाठी सहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत निवडलेली उत्कृष्टता केंद्रे म्हणजे क्लिनिकल रिसर्च, आयुष आरोग्य सेवा (रुग्णालये), आयुषच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित संशोधन, आयुषच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित संशोधन, फार्माकॉग्नॉसी आणि फार्माकोलॉजी, उत्पादन विकास यात अंतर्गत संशोधन आणि आयुष व आधुनिक विज्ञान यात दुवा साधणाऱ्या संस्था आहेत.

हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळ सह दहा विभिन्न राज्यातील अठरा उत्कृष्टता केंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले. या योजनेची उद्दिष्टे साध्य करताना आणि मंत्रालयाच्या मानकांचे अनुपालन करताना काही आव्हानांचा सामना करावा लागला तर उत्कृष्टता केंद्रांवर पडणारा प्रभाव अजमावण्याची संधी या मूल्यांकनाद्वारे मिळाली. मेसर्स सीएमआरएसडी यांनी केलेले या योजनेचे मूल्यांकन हे अन्वेषणकारी, विस्तृत आणि विश्लेषणात्मक स्वरूपात होते. मूल्यांकनाचा भाग म्हणून प्राथमिक आणि द्वितीय स्तरावरील संशोधन झाले.

या केंद्रांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये आयुर्वेद उपाय समाकलित कर्करोगाचा उपचार, दमा आणि संधिवात यावर आयुर्वेदिक उपचार, युनानी औषधाची रेजिमेंटल थेरपी (इलाज बिल्ल तडबीर) च्या सहाय्याने, आयुर्वेदाद्वारे नेत्ररोग चिकित्सा आणि दिव्यांगांसाठी होमिओपॅथिक उपचार यांचा समावेश आहे.

या निष्कर्षांमुळे प्रोत्साहित होऊन आयुष मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने उत्कृष्टता केंद्र योजनेची व्यवहार्यता आणि तिचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694534) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil