गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना
स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 पुढील 5 वर्षांसाठी जाहीर
Posted On:
02 FEB 2021 5:48PM by PIB Mumbai
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात माननीय अर्थमंत्र्यांनी, शाश्वत विकासाचे ध्येय-6 याअंतर्गत (SDG Goal-6) जल जीवन मिशन (शहरी) योजना ज्याची रचना सर्व 4378 वैधानिक शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे, ती जाहीर केली.याचे दुसरे लक्ष्य 500 अमृत(AMRUT cities )शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन हे आहे. स्वच्छ भारत मिशन (शहरी)-2.0 ही योजना आरोग्य आणि कल्याण या अंतर्गत सुरू करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी हे जाहीर केले.अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की,संघटीत बससेवेचे सबलीकरण करण्यासाठी डोंगराळ भाग/केंद्रशासित प्रदेश/पूर्वोत्तर राज्यांतील राजधान्यांसह 5 लाखांपेक्षा अधिक शहरांमध्ये 20,000 बसेस सुरु करण्याची योजना आखली असून त्यामुळे शहरांमधील गतीमानता वाढून जीवन सुखकर होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694478)
Visitor Counter : 406