इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एनआयसीएसआयचा 25 वा स्थापना दिन साजरा

Posted On: 28 JAN 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रांतर्गत राष्ट्रीय माहिती सेवा केंद्र समाविष्ट (एनआयसीएसआय) सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने आज 25 वा स्थापना दिन साजरा केला. केंद्रीय दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर व सेवा पुरवण्यात एनआयसीएसआयचे मोठे सहकार्य लाभले आहे. काही कालावधीत एनआयसीएसआयने राष्ट्रीय प्रमाणन माहिती केंद्रामध्येही विविधता आणली आहे. आम्ही एनआयसीएसआय सोबत अनेक ई शासन प्रकल्प राबवले आहेत आणि त्यांना राष्ट्रीय सार्वजनिक डिजिटल मंचावर एकत्र आणणे ही भावी वाटचाल असेल, असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सावनी यांनी एनआयसीएसआयच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर प्रकाश टाकताना सांगितले.

कार्यक्रमादरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी तेजस - ए व्हिज्युअल इंटेलिजन्स टूल, ई-ऑक्शन इंडिया, वर्क फ्रॉम एनीव्हेअर, एनआयसी प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचे उद्‌घाटन केले आणि एनआयसीएसआयच्या रौप्य महोत्सवी ई-ब्रोशरचे अनावरण केले.

 अधिक माहितीसाठी कृपया येथे पहा.

M.Pange/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1692985) Visitor Counter : 254