संरक्षण मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                27 JAN 2021 9:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेचे नवनियुक्त संरक्षण सचिव जनरल (सेवानिवृत्त) लॉयड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.  
संरक्षण मंत्र्यांनी सचिव ऑस्टिन यांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल याआधीच अभिनंदन केले होते.
दूरध्वनी वरील चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी बहुआयामी भारत - अमेरिका  संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.
संरक्षण मंत्री आणि सचिव ऑस्टिन यांनी यावेळी  द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा केली.
 
S.Kane/S.Mhatre/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1692805)
                Visitor Counter : 201