माहिती आणि प्रसारण मंत्रालय

हायवेज ऑफ लाईफ हा चित्रपट मणिपूरचे ट्रक चालक आणि त्यांच्या संघर्षाबद्दल आहे - दिग्दर्शक अमर मायबम


इफ्फीच्या इंडियन पॅनोरामामध्ये फिल्म डिव्हिजनचा माहितीपट

Posted On: 24 JAN 2021 8:36PM by PIB Mumbai

 

फिल्म्स डिव्हिजनचा 52 मिनिटांचा माहितीपट अमरजित सिंग मायबम यांनी बनवला असून यात ट्रकचालकांच्या गटाचा प्रवास दाखवण्यात आला आहे जे धोकादायक महामार्गांवरून आपला जीव धोक्यात घालून, मणिपूरमधील लोकांच्या सेवेसाठी आवश्यक वस्तूची वाहतूक करतात. इंडियन पॅनोरामा नॉन-फीचर फिल्म्स अंतर्गत 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

ईशान्य भारताच्या महामार्गांबाबत हा एक संवादात्मक चित्रपट आहे. मी 2014 मध्ये माहितीपटाचे चित्रीकरण सुरू केले आणि 2017 पर्यंत करत होतो जेणेकरुन मी ते क्षण कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करू शकेन. 2018 मध्ये त्याचे काम पूर्ण केले . " मायबाम आज 24 जानेवारी 2021 रोजी पणजी येथे इफ्फी महोत्सवात पत्रकार परिषदेत बोलत होते. काल हा माहितीपट दाखविण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्ग 2 आणि 37 जे मणिपूरची जीवनरेखा मानले जातात. ते या राज्याला उर्वरित जगाशी जोडतात . पाच वर्षांच्या कालावधीत बनवलेल्या या माहितीपटात आर्थिक नाकेबंदी, संप, खंडणी आणि खराब रस्ते याचे चित्रण आहे ज्यामुळे महामार्ग ट्रकचालकांच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे.

उर्वरित भारताला मणिपूर राज्याविषयी फारच कमी ज्ञान का आहे यामागील एक कारण त्यांनी सांगितले. आपल्या शिक्षणपद्धतीत मणिपूर राज्याविषयी फारसे काही माहिती नाही.

हा चित्रपट निर्माण करणाऱ्या फिल्म्स डिव्हिजनचे त्यांनी आभार मानले.

या चित्रपटाने लिबरेशन डॉकफेस्ट बांग्लादेशमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपट, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट, सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि मणिपूर राज्य चित्रपट पुरस्कार २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट संकलनासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

अमरजीतसिंग मायबाम

अमरजीतसिंग मायबाम यांनी दूरदर्शनसाठी अनेक कल्पित आणि अकल्पित कथा दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांच्या स्वतंत्र माहितीपटांमध्ये 'सिटी ऑफ व्हिक्टिम्स’, ‘माय जनरस व्हिलेजआणि (सह-दिग्दर्शित) नावा - स्पिरीट ऑफ अटेयांचा समावेश आहे.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691994) Visitor Counter : 203