माहिती आणि प्रसारण मंत्रालय

शासक आणि नागरिक कसे असावेत हे “नमो” आपल्याला दाखवते: दिग्दर्शक विजीश मणी


“संस्कृतकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी संस्कृतमध्ये एक चित्रपट बनविला”

पणजी, 23 जानेवारी 2021

 
हा चित्रपट जो  संस्कृत भाषेच्या समृद्ध परंपरेला प्रोत्साहन देतो आणि आपल्याला प्राचीन कृष्णा-कुलेचा कथेकडे परत घेऊन जातो, तो हा नमो चित्रपट आहे.  “संस्कृत ही समृद्ध भाषा आहे परंतु मला आढळले आहे की त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. म्हणून, मला संस्कृत भाषेत चित्रपट बनवायचा होता. ” असे दिग्दर्शक विजिश  मणी यांनी आज, 23 जानेवारी, 2021 रोजी, गोवा येथील पणजी येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेत सांगितले.  102-मिनिटांचा 2019 सालचा हा चित्रपट काल महोत्सवात दाखवण्यात आला.

चित्रपटाचा मध्यवर्ती संदेश स्पष्ट करताना  मणि म्हणतात : “एक राज्यकर्ता आणि एक नागरिक कसा असावा हे हा चित्रपट दाखवतो. ‘नमो’ चे  कथानक वर्तमानात  सुरू होते आणि कृष्णा आणि सुदामा  यांच्यातील संबंधाशी  आपल्याला पुन्हा जोडते. . ”

नमोचे कलाकार आणि तंत्रज्ञ  देशाच्या विविध भागातून आलेले आहेत. याकडे दिग्दर्शकाने लक्ष वेधले.  "पद्मश्री अनूप जलोटा यांनी संगीत दिले. बी. लेनिन सर यांनी संकलन  केले आणि सिनेमॅटोग्राफर लोगानाथन यांनी चित्रित केला. ."

वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये प्रयत्न करण्याची दिग्दर्शक म्हणून इच्छा त्यांनी व्यक्त केली.  “मला नेहमीच वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांचे दिग्दर्शन करायचे होते. माझा पहिला विश्वगुरु (मल्याळम) चित्रपट पटकथेपासून  प्रदर्शनापर्यंत. 51 तासांत पूर्ण झाला,   सर्वात जलद निर्मिती झालेला  चित्रपट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली.  तो चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित झाला. ”

आपल्या पसंतीच्या शैलींच्या निवडीमध्ये स्वायत्तता कशी टिकवून ठेवू शकले हे  त्यांनी सांगितले. “मी स्वतः माझे सर्व चित्रपट तयार करतो. यामुळे मला शैली स्वतंत्रपणे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.  मी स्वत: निर्माता असल्यामुळे मी चित्रपट निर्मितीबाबत बरेच प्रयोग करू शकतो. ”

दिग्दर्शकाने आदिवासी भाषेतही चित्रपट केले आहेत. त्यांचा ‘नेताजी’ हा चित्रपट ‘इरुला’ मध्ये बनलेला नीलगिरी हिल्सच्या रहिवाशांद्वारे बोलल्या जाणाऱ्या  द्रविड भाषेतला पहिला चित्रपट आहे, . या आदिवासी भाषेतील पहिला चित्रपट म्हणून या चित्रपटाने गिनीज रेकॉर्डमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी 2019 मध्ये गोव्यात 50 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या इतर चित्रपटांमध्ये पुझायम्मा (मल्याळम), जो  पूर्णपणे नदीमध्ये चित्रित  झाला आहे, आणि मम्म्म्म् (कुरुंबा - किमान लोकप्रिय आदिवासी भाषा) यांचा समावेश आहे. पुझायम्मा हा पर्यावरणविषयक जनजागृती करणारा चित्रपट आहे ज्याला एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691748) Visitor Counter : 233


Read this release in: Urdu , Hindi , Punjabi , English