माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वास्तविक गोष्टींच्या प्रेमात पडण्याचे निमंत्रण म्हणजे ॲन इम्पोसिबल प्रोजेक्ट हा चित्रपट -दिग्दर्शक जेन्स म्युरर

Posted On: 22 JAN 2021 11:07PM by PIB Mumbai

पणजी, 22 जानेवारी 2021

तुमचे फोन खाली ठेवा आणि डिजिटल मुक्ती मिळवा. दिसायला अतिशय अशक्य वाटणारा हा सल्ला 51व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या विभागातील जर्मन चित्रपटाने दिला आहे. पुन्हा वास्तववादी व्हा, पत्रे लिहायला पुन्हा सुरुवात करा. दिग्दर्शक जेन्स म्युरर यांनी ही जिव्हाळ्याची सूचना केली आहे. गोव्यामध्ये पणजी येथे सुरू असलेल्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे काल विशेष स्क्रीनिंग झाल्यावर आज आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.

डिजिटल आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण तुम्हाला सर्व काही डिजिटल करायचे आहे का? असा प्रश्न नव्या डिजिटल युगात या चित्रपटाच्या महत्त्वाचे समर्थन करताना जेन्स विचारतात. इफ्फीमध्ये दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांपैकी हा एकमेव चित्रपट 35 मिमीवर चित्रित करण्यात आला आहे, असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.

काही प्रमाणात इंटरनेट चांगले आहे तितकेच इतर प्रकारे वाईटही आहे. काही वास्तविक गोष्टी पुन्हा करणे अतिशय गरजेचे आहे कारण इंटरनेट आपल्याला अनेक वाईट गोष्टी देत आहे, वाईट आरोग्य, वाईट प्रेम आणि वाईट राजकारण या देणग्या आपल्याला इंटरनेट देत आहे.

डिजिटल वाईट आणि ऍनालॉग चांगले हे सांगण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न नाही असे त्यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट संतुलनाविषयी सांगत आहे. जर काही लोकांनी अद्यापही ऍनालॉग आहे असा युक्तिवाद केला तर तुम्हाला ते संतुलन मिळू शकेल, असे ते सांगतात. इस्तंबुल फिल्म फेस्टिवल आणि रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली होती. जेन्स म्युरर यांनी सोविएत युनियन, दक्षिण आफ्रिका, इस्राएल आणि अमेरिकेत माहितीपट दिग्दर्शित केले आहेत आणि त्यानंतर ऑस्कर नामांकन मिळालेल्या द लास्ट स्टेशनची निर्मिती केली.

 

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691430) Visitor Counter : 154


Read this release in: Hindi , Urdu , English , Punjabi