माहिती आणि प्रसारण मंत्रालय
14 फेब्रुवारी अँड बियाँड व्हलेंटाईन डेच्या व्यावसायिक स्वरुपावर आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकतो- दिग्दर्शक उत्पल कलाल
पणजी, 22 जानेवारी 2021
व्हॅलेंटाईन डे आपल्या समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. हा अतिशय रोखठोक आणि स्पष्ट संदेश 14 फेब्रुवारी अँड बियाँड या 51व्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमामधील नॉन फीचर फिल्म देत आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल यांनी सांगितले. या दिवसाचे खूप मोठ्या प्रमाणावर झालेल्या व्यापारीकरणाकडे हा चित्रपट लक्ष वेधत आहे, असे ते म्हणाले. 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये या चित्रपटाचे काल प्रदर्शन झाल्यानंतर आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. हा चित्रपट प्रेम साजरे करण्याच्या विरोधात नाही, मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कशा प्रकारे आपल्या फायद्यासाठी मानवी भावभावनांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याचे दर्शन घडवत आहे, असे उत्पल यांनी स्पष्ट केले. हा दिवस प्रत्यक्षात प्रेमाने ओतप्रोत भरलेला असायला हवा होता पण त्याचे रुपांतर मानवनिर्मित आपत्तींमध्ये आणि खूप मोठ्या गोंधळात झाले आहे आणि त्याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वे या माहितीपटामध्ये पाहायला मिळतात.


M.Chopade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691426)