अर्थ मंत्रालय

प्राप्तिकर विभाग पुणे क्षेत्राचे ठाण्यामध्ये छापे

Posted On: 21 JAN 2021 10:20PM by PIB Mumbai

 

प्राप्तिकर विभागाने 12-1-2021 रोजी ठाणे जिल्ह्यामधील मीरा- भाईंदर भागामध्ये प्रमुख बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित प्रकरणी छापे घातले. यावेळी केलेल्या कारवाईत 10.16 कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेल्या रोख रकमेसहित यापूर्वीच्या वर्षांचे एकूण 520.56 कोटी रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न आढळले. जमीन आणि सदनिकांच्या विक्रीद्वारे मिळालेले हे उत्पन्न होते, तसेच बनावट कंपन्यांच्या नावाने विनातारण अवैध कर्जांच्या, प्रारंभिक भांडवल/ कर्जाऊ रोख रक्कम, बेहिशोबी खर्चासाठी रोख रक्कम आदिंच्या स्वरुपात बेहिशोबी रोख रक्कम मिळाल्याच्या नोंदी आढळल्या. त्याशिवाय 2019-20 या आर्थिक वर्षात या समूहाने 514.84 कोटी रुपयांचा बेहिशोबी विक्री महसूल प्राप्त केल्याचे देखील तपासादरम्यान आढळले.

त्यानुसार या समूहाने यासाठी स्वयं मूल्यांकन कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. या शोध मोहिमे दरम्यान सापडलेल्या लॉकर्सची तपासणी अद्याप बाकी असून पुढील तपास सुरू आहे.

 

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691065) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi