माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘इन्व्हेस्टिंग लाइफ’ - इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करणार्या तीन सामान्य व्यक्तींचा चित्रपट
सामाजिक बहिष्कार, रस्ते अपघात आणि मनुष्य-प्राणी संघर्ष यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वावर आधारित असलेला चित्रपट. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या, फिल्म डिव्हिजनने निर्मिती केलेल्या ‘इन्व्हेस्टिंग लाइफ’ या लघुपटाची दिग्दर्शिका वैशाली वसंत केंदळे हिने या चित्रपटाचे वर्णन केले. या चित्रपटाकडे जीवनपट म्हणून बघू नका असे वैशाली यांनी यावेळी सांगितले. ही तीन व्यक्तींच्या निस्वार्थ कामाला मिळवून दिलेली ओळख आहे. “ते आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक जीवाच्या अस्तित्वासाठी वर्षानुवर्षे शांतपणे आणि एकट्याने आपले आयुष्य खर्ची करत आहेत, ज्यामुळे मानवजाती आणि पर्यावरणाची उन्नती होईल. तळागाळात काम करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आहेत. त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात त्यांना कशाचीही अपेक्षा नसते”, असे ती म्हणाली.
चित्रपटात रस्ते अपघाताच्या दृशाच्या चित्रिकरणा संदर्भात दिग्दर्शिका म्हणाली, “ चित्रपटात अपघात होत आहे असे दाखवण्यासाठी मी तयार नव्हते. हे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. माझे नैतिक मूल्य मला अपघाताचे चित्रीकरण करण्यात आणि प्रेक्षकांना तो अपघात दाखविण्यास दुजोरा देत नव्हते. माझ्या या मताला अनेकांचा विरोध होता. मी रस्ते अपघाताचा ऑरा निर्माण करण्याचे ठरविले. मी त्यासाठी मॉन्टेजेस वापरली. या पद्धतीने मी रस्ते अपघात दाखविला.” चित्रपटाने तीन समांतर कथा सांगण्यासाठी वास्तविकता आणि रूपकांचा उपयोग केला.
या चित्रपटात चित्रित केलेली तळागाळातील सामान्य माणसे इतरांसाठी आपले जीवन व्यतीत करत आहेत. म्हणूनच, या चित्रपटाचे नाव ‘इन्व्हेस्टिंग लाइफ’ ठेवल्याचे तिने सांगितले. “महान लोकांच्या आयुष्यावर चरित्रपट बनविले जातात. परंतु, आपल्या जगात प्रत्येक सजीव आणि सामान्य लोकांची महत्वाची भूमिका आहे. अशा सर्व वैयक्तिक भूमिका महत्वाच्या आहेत.” असे केंडले यांनी चित्रपटाच्या मागील विचारांबाबत सांगितले.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691041)
Visitor Counter : 200