माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अब बेगम हीरो बनेगी: मेहरुनिसा

"जुन्या काळातील अभिनेत्रींवर आधारित कथा का नाहीत?"

Posted On: 21 JAN 2021 8:33PM by PIB Mumbai

 

पुरुषप्रधान भारतीय चित्रपटसृष्टीविरोधात मेहरुनिसा आवाज उठवत आहे. उमराव जान फेम फरुख जाफर यांनी 80 वर्षांच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे जी प्रेक्षकांना त्यांची स्वप्ने साकारण्याचे धाडसी आवाहन करताना सांगते की वय महत्वाचे नाही.

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिंदी भाषेतील ऑस्ट्रियन चित्रपट आणि मिड फेस्ट फिल्म 'मेहरूनिसा' या चित्रपटाचा काल वर्ल्ड प्रीमियर पार पडला.

आज पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक संदीप कुमार म्हणाले: "चित्रपटाची भावना भारतीय आहे, आणि म्हणूनच आम्हाला भारतीय भूमीवर याचा प्रीमियर करायचा होता. मेहरनिसासह इफ्फीमध्ये सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. . काल या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप भारावून गेलो आहोत. 40 वर्षांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टी गाजवलेल्या भारतीय सिनेमातील या महान अभिनेत्रीला हा मानाचा मुजरा आहे."

केवळ भारतीय चित्रपट उद्योगातच अभिनेत्रींच्या वयाला महत्व असते. जेव्हा पुरुष, जे तेवढेच वयस्कर आहेत, ते मात्र चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारू शकतात, मग महिला का नाहीत ?’ असा प्रश्न लखनौमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट विचारतो. पडतो. ' माझा वास्तववादी ठिकाणी चित्रीकरण करण्यावर विश्वास आहे. मेहरूनिसाचे चित्रीकरण झालेली सर्व स्थाने खरी आहेत ,असे दिग्दर्शक म्हणाले.

कुमार यांनी चित्रपटाच्या कथेने कसे मूळ धरले याचा प्रवास उलगडून सांगितला. "या चित्रपटाची कल्पना पुढे आली कारण मला आश्चर्य वाटत होते की जुन्या जमान्यातील सर्व अभिनेत्री कुठे आहेत, आणि त्या भारतीय चित्रपटात का दिसत नाहीत . त्या केवळ दिसण्यापुरत्याच आहेत. माझा विचार असा होता की त्यांच्याबद्दल काही किस्से का नाहीत? 'युरोपमध्ये 80, 90 वयाचे ज्येष्ठ नागरिक जे कलाकार आहेत ते मुख्य भूमिकेत दिसतात. "

दिग्दर्शकांनी आपल्या प्रमुख अभिनेत्रीच्या कारकीर्दीबद्दल एक रोचक तथ्य निदर्शनास आणून दिले. आपल्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत फारुख जाफरने तीन खानांबरोबर काम केले आहे, मात्र वयाच्या 88 व्या वर्षी ही तिची पहिली मुख्य भूमिका आहे! 'मेहरूनिसा' भारतीय चित्रपटसृष्टीत परिवर्तन घडवून आणेल.

स्टोरी बेच रहे हो या स्टार बेच रहे हो ?: मेहरुनिसा

(तुम्ही कथा विकत आहात की सिनेस्टार ?)

या चित्रपटाचे अनुभव सांगताना अभिनेत्री अंकिता दुबे जी मेहरूनिसाच्या नातीची भूमिका साकारत आहे, ती म्हणते: पटकथा इतकी खरी आणि वास्तववादी होती, की जेव्हा मी पहिल्यांदा ती पाहिली तेव्हा तिने माझे लक्ष वेधले. त्यात काहीतरी लपलेले होते. "

अभिनेत्री तुलिका बॅनर्जी, जिने मेहरूनिसाच्या मुलीची भूमिका साकारली आहे, ती म्हणाली : तरुणांकडे ज्ञान आणि उपकरणे असतील परंतु आयुष्याचा अनुभव मोठ्यांकडेच असतो. वय ही केवळ एक संख्या आहे. हा सशक्त संदेश हा चित्रपट देतो. "

लखनौने केलेला पाहुणचार आणि प्रेमाबद्दल ते बोलतच राहिले. "माझे तंत्रज्ञ प्रथमच भारतात आले आणि इथल्या लोकांनी केलेला पाहुणचार पाहून ते लखनऊच्या लोकांच्या प्रेमात पडले."

We are extremely happy that we are celebrating our world premiere at @IFFIGoa today. #IFFI has been such a good host to us. It is so well organised in the mid of the #pandemic: @1stSandeepKumar, Director of Mehrunisa

Watch the premiere today at Kala Academy, Panaji @ 6:30 PM pic.twitter.com/O9btSTqRNJ

— PIB in Goa (@PIB_Panaji) January 20, 2021

तुम्ही ऑस्ट्रियाहून जाफरवर चित्रपट बनवण्यासाठी आला आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असे लखनौच्या लोकांनी मुखाने सांगितले होते.

मेहरुनिसा हे आमचे महान स्वप्न होते. प्रथमच ऑस्ट्रियन निर्मिती पूर्णपणे भारतात आणि भारतीय भाषेत चित्रित केली आहे . ऑस्ट्रिया आणि तेथील चित्रपट उद्योग सध्या गोव्याकडे पहात आहे. - दिग्दर्शक संदीप कुमार अभिमानाने म्हणाले

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1691013) Visitor Counter : 12


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi