वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांनी लॉजिस्टिक्स विषयावरील राज्यांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2021 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
विचाराधीन असणारी राष्ट्रीय लॉजिस्टिक योजना राष्ट्रीय लॉजिस्टिक्स परिषद आणि राज्य लॉजिस्टिक समन्वय समिती समवेत लॉजिस्टिक्स केंद्रांसाठी उत्तम समन्वय आणि एकात्मिक विकासासाठी एक साचा म्हणून काम करेल असे केंद्रीय रेल्वे; वाणिज्य आणि उद्योग; ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. लॉजिस्टिक विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले की वाणिज्य व उद्योग मंत्रालयामधील लॉजिस्टिक टीम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे वाहतूक, कागदपत्रे आणि भागधारकांचे विविध साहित्य सोप्या कार्य पद्धतीमध्ये समाकलित करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामुळे व्यापार सुलभीकरण देखील वृद्धिंगत होईल.
ते म्हणाले की लॉजिस्टिक ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी आहे, आणि ते साध्य करण्यासाठी संबंधित पायाभूत सुविधा आवश्यक आहेत.
गोयल म्हणाले, भारतात आमच्याकडे 200 बिलियन डॉलर्सची लॉजिस्टिक पारिस्थितीक व्यवस्था आहे. यातील चांगला भाग म्हणजे याला भारतीय रेल्वे यातील मोठा भाग पुरवते. “आम्ही लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करण्याचा आणि रेल्वे पुरवित असलेल्या सेवेची व्याप्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहोत. कोविड संकटाला संधीमध्ये रुपांतरीत करून रेल्वेने आपल्या कामकाजाची नवीन पद्धती अवलंबली. शून्य-आधारित वेळापत्रक तयार केले होते. काल, 18 जानेवारीला मालवाहतुक ट्रेनचा सरासरी वेग 46.77 किमी प्रतितास एवढा होता. मागील वर्षी याच कालावधीत हा वेग 22.47 किमी प्रतितास होता. ”
मंत्री म्हणाले की यावर्षी जानेवारीच्या पहिल्या 18 दिवसांत मालवाहतुक ट्रेनचा सरासरी वेग मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 97 % जास्त आहे. 2022 पर्यंत आमच्याकडे पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहू कॉरिडोर सज्ज असतील.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690196)
आगंतुक पटल : 221