इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन्स प्रयोगशाळा उभारणार

नवनिर्मितीला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देणारी ही एडब्लूएस अर्थात ऍमेझॉन वेब सर्विसच्या मदतीने भारतात जगातील पहिली क्वांटम कंप्युटिंग प्रयोगशाळा

Posted On: 19 JAN 2021 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय( मेती) क्वांटंम कंप्युटिंग आधारित संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि नव्या शास्त्रीय शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी एडब्लूएस अर्थात ऍमेझॉन वेब सर्विसच्या मदतीने देशात क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन प्रयोगशाळा उभारणार आहे. मेती क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन्स प्रयोगशाळेमुळे सरकारी मंत्रालये आणि विभाग, संशोधक, शास्त्रज्ञ, शैक्षणिक समुदाय आणि विकासक यांना उत्पादन, आरोग्यनिगा, कृषी आणि हवाई उद्योग अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी एक सेवा उपलब्ध होणार आहे. या प्रयोगशाळेला तांत्रिक आणि प्रोग्रामविषयक पाठबळ पुरवण्याचे काम ऍमेझॉन वेब सर्विस करणार आहे. मेतीच्या या उपक्रमामुळे वैज्ञानिक, शैक्षणिक आणि विकासक समुदायाला सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्राधान्यक्रमाच्या योजनांशी संलग्न क्वांटम कंप्युटिग विकासविषयक सुविधा होणार आहेत.

संगणकीय माहितीवर प्रक्रिया करणाऱी शक्तिशाली साधने निर्माण करण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्स क्षेत्रातील सिद्धांताचा वापर करणारे क्वांटम कंप्युटिंग क्षेत्र नव्याने उदयाला येत आहे. नेहमीच्या वापरातील संगणकांच्या आवाक्याबाहेर असणारे गणनाविषयक प्रश्न सोडवण्याची क्षमता यामध्ये आहे आणि हे क्षेत्र केमिकल इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, औषधांचे शोध, फायनान्शियल पोर्टफोलियो ऑप्टिमायजेशन, मशीन लर्निंग या क्षेत्रात नावीन्यपूर्ण घडामोडींना चालना देऊ शकेल आणि इतर बरेच काही करू शकेल.

ऍमेझॉन वेब सर्विसच्या सहकार्याने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (मेती)  क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन प्रयोगशाळा उभारून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल टाकताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे मंत्रालयाचे  सचिव अजय साहनी यांनी सांगितले.

भारतातील वैज्ञानिक समुदायाला सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलणाऱ्या मेतीच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत असे ऍमेझॉन वेब सर्विसच्या वर्ल्डवाईड पब्लिक सेक्टर, इंटरनॅशनल सेल्सचे उपाध्यक्ष मॅक्स पीटर्सन यांनी सांगितले.

 मेतीच्या क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन्स प्रयोगशाळेला पाठबळ देऊन क्वांटम कंप्युटिंग अधिकाधिक शास्त्रज्ञ, संशोधक, विकासक आणि संघटनांना उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे त्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध होऊन त्याविषयीचे प्रयोग करणे शक्य होणार आहे आणि क्वांटम अल्गॉरिदममधील प्रत्यक्ष वापराच्या क्षेत्रांचा शोध घेता येणार आहे , असे पीटर्सन म्हणाले.

मेती क्वांटम कंप्युटिंग ऍप्लिकेशन्स प्रयोगशाळा सरकारी संस्था आणि वैज्ञानिक समुदायाला विविध प्रकारच्या समस्या आणि संधी लक्षात घेण्यासाठी मदत करणार आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष विश्वातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयोगांच्या आणि प्रतीकृतींच्या माध्यमातून कमी जोखमीच्या वातावरणात चाचण्या करता येणार आहेत.

 

Jaydevi P.S/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1690180) Visitor Counter : 57


Read this release in: English , Hindi , Tamil