शिक्षण मंत्रालय

नेहरू सेंटर, लंडन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बाबत संवाद

Posted On: 19 JAN 2021 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

लंडन स्थित नेहरू सेंटरने नॅशनल बुक ट्रस्ट, भारत (शिक्षण मंत्रालय अंतर्गत)च्या सहकार्याने 18 जानेवारी 2021 रोजी नवीन शिक्षण धोरण 2020 - एनईपी आउटरीच या विषयावर संवाद आयोजित केला होता.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनईपी -2020 ची भविष्यवादी मानसिकतेने अंमलबजावणी करण्यात आली आणि आव्हानांचे संधींत रूपांतर करण्यात आले. पारंपारिक ज्ञान प्रणालीचे जतन आणि विकास करताना जागतिक ज्ञान प्रणालीत भारताला स्थान मिळवून देण्यास हे धोरण मदत करेल. या धोरणाद्वारे आपण शिक्षण पद्धतीचा कायापालट करू आणि विश्लेषणात्मक विचार आणि समस्यांचे निराकरणसर्जनशील व बहु-शाखीय कसे बनावे आणि बदलत्या क्षेत्रात नवीन साहित्य कसे परिवर्तित करावे  याबाबत शिकण्यावर विशेष भर दिला जाईल.

आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की एनईपी -2020 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेली सर्वात मोठी सुधारणा आहे.

ब्रिटनचे माजी विद्यापीठ, विज्ञान, संशोधन मंत्री आणि शिक्षणतज्ज्ञ होन जो जॉन्सन यांनी भारताच्या नवीन शिक्षण धोरणाचे कौतुक केले . ही जागतिक महत्वाची बाब असून यामुळे भारत जागतिक ज्ञान महासत्ता बनेल असे ते म्हणाले.

 

या कार्यक्रमाचे संचालन लंडनस्थित नेहरू सेंटरचे संचालक अमिश त्रिपाठी यांनी केले.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690161)