माहिती आणि प्रसारण मंत्रालय
यंदा इफ्फीत कंट्री फोकस मध्ये बांगलादेशचा समावेश ही बांगलादेश मुक्तीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठी आदरांजली आहेः चित्रपट दिग्दर्शक तन्वीर मोकम्मेल
पणजी, 17 जानेवारी 2021
“यावर्षी IFFI मध्ये बांग्लादेश हा 'कंट्री ऑफ फोकस' देश आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यासाठी आम्ही आयोजकांचे अपार आभार मानू इच्छितो,” असे बांगलादेशचे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक तन्वीर मोकम्मेल यांनी म्हटले आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्याच्या जीवनावर आधारित काल्पनिक जीवनपट “रूपसा नोडिर बांके’, (शांतपणे वाहते ‘रूपसा नदी)’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
JVIT.JPG)
“हे वर्ष एक उचित वर्ष आहे, कारण यावर्षी बांगलादेश मुक्तीचा तसेच भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंधांच्या 50 व्या वर्धापन दिनाचे औचित्य आहे." याकडे तन्वीर यांनी लक्ष वेधले . 'रूपसा नोदिर बांके व्यतिरिक्त, तन्वीर यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक चित्रपट ‘जीवनधुली’ हा ही कंट्री ऑफ फोकसचा भाग म्हणून 51 व्या इफ्फीमध्ये दाखविला जात आहे.
कंट्री ऑफ फोकस हा एक विशेष विभाग आहे जो त्या देशातील चित्रपट उत्कृष्टता आणि योगदानाचा गौरव करतो. या विभागाच्या उद्घाटन सोहळ्याचा एक भाग म्हणून, गोव्यातल्या पणजी येथील आयनॉक्स येथे आज" रुपसा नोदिर बांके " दाखवण्यात आला.

चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना तन्वीर पुढे म्हणाले की, ‘रूपसा नोडिर बांके’ ही डाव्या विचारसरणीच्या नेत्याची कहाणी आहे, ज्याच्याकडे सर्व समर्पण तसेच गुण होते , परंतु काळ त्याच्या विरोधात होता. तो लाटेच्या विरुद्ध धावत होता. तो एका ग्रीक शोकांतिकेच्या पात्रासारखा आहे, ज्याचा विनाश त्याचा स्वतःचा दोष नसतानाही अपरिहार्य होता.
गेल्या वर्षी जग सोडून गेलेले प्रतिष्ठित अभिनेते सौमित्र चटर्जी यांच्याविषयी आपले विचार सांगताना तन्वीर म्हणाले की सौमित्र्य चटर्जी हे हाडाचे कलाकार होते आणि त्यंचत जाण्याने बंगाली सिनेमाने खरा हिरा गमावला आहे.

चित्रपटाचे संकलक महादेव शी हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते , त्यांनी तन्वीर मकम्मेल यांच्यासोबत वर्षानुवर्षे काम करण्याचा अनुभव सांगितला. “संकल्पना अतिशय सामान्य असल्याने हा चित्रपट उत्सवासाठी फारच प्रासंगिक आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून तन्वीरबरोबर काम करत आहे. आम्ही अशा प्रकारच्या विचारसरणी आणि मूल्यांवर विश्वास ठेवतो.
पार्श्वभूमी:
तनवीर मोकम्मेल हे बांगलादेशचे एक सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या चित्रपटांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सात चित्रपट आणि 14 माहितीपट बनवले आहेत.
दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना यावर्षी इफ्फी श्रद्धांजली अर्पण करत आहे आणि चारूलता, घर बैरे, पाथेर पांचाली, शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे त्यांचे निवडक चित्रपट महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1689539)
आगंतुक पटल : 204