पंचायती राज मंत्रालय

प्रशासनात पारदर्शकता आणल्याबद्दल पंचायत राज मंत्रालयाचा स्कॉच चॅलेंजर पुरस्काराने सन्मान

Posted On: 16 JAN 2021 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

प्रशासनाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणल्याबदल केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचा स्कॉच चॅलेंजर पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पंचायत राज विभागाचे सचिव सुनील कुमार, यांनी आज मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातील पंचायत राज संस्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सुरु करणे,कार्यप्रणालीत सुधारणा, अधिक पारदर्शकता आणि ई-प्रशासन अधिक मजबूत करणे, या उपलब्धींसाठी मंत्रालयाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 70 व्या स्कॉच शिखर परिषदेदरम्यान (स्कॉच सार्वजनिक धोरण मंच) आभासी स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलतांन सुनील कुमार यांनी पुरस्कारासाठी पंचायत राज विभागाची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पंचायत राज मंत्रालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी स्कॉच ग्रुपला धन्यवाद दिले. तसेच या परिषदेत, विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. या परिषदेत, ‘एकात्मिक वाढ आणि सार्वजनिक धोरणे’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात, सुनील कुमार यांच्यासह, पंतप्रधानांचे सल्लागार अमरजीत सिन्हा, ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव एन एन सिन्हा सहभागी झाले होते. स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांनी चर्चासत्राचे संचालन  केले.

देशभरातून अनेक लोक या परिषदेत आभासी स्वरूपात सहभागी झाले होते.

लोकशाही व्यवस्थेत, विकेंद्रीकरणाची इमारत ही लोकसहभाग आणि पारदर्शकत तसेच जबाबदारीच्या स्तंभांवर उभी असते, असे सुनील कुमार यावेळी म्हणाले. 

कोविड महामारीने देशातील विविध संस्थांची ताकद आणि क्षमता यांची परीक्षा पाहिली असे सांगत, पंचायत  राज संस्थांनी कोविड नियंत्रण तसेच व्यवस्थापणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामांची त्यांनी माहिती दिली.

आजपर्यंत, देशातील 1.7 लाख पेक्षा जास्त ग्रामपंचायती सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत. तसेच, 1.45 लाख ग्राम पंचायतीनी, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत सर्व निधीचे डिजिटल पेमेंट करण्यास सुरुवात केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

स्कॉच चॅलेंजर पुरस्काराविषयी माहिती

स्कॉच चॅलेंजर पुरस्कार भारतातील सर्वोच्च स्वायत्त सन्मान म्हणून ओळखला जातो आणि सखोल संशोधन तसेच तज्ञांच्या मूल्यमापनानंतर त्यांची निवड केली जाते. भारताला एक उत्तम राष्ट्र बनवण्यासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

 

Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689156) Visitor Counter : 267


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil