माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीः इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिट॒टोरिओ स्टोरारो यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2021 3:28PM by PIB Mumbai
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीः) उद्या (16 जानेवारी, 2021) होणार्या उद्घाटन समारंभात इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिटोरिओ स्टोरारो यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

'द बर्ड विथ द क्रिस्टल प्लमेज' (1970) या चित्रपटामुळे ते लोकप्रिय झाले. द कन्फर्मिस्ट (1970), लास्ट टँगो इन पॅरिस (1972), 1900 (1976), अपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981), द लास्ट एम्परर (1987), डिक ट्रेसी (1990 ), कॅफे सोसायटी (2016) आणि वंडर व्हील (2017) यासारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
स्टोरारो यांना अॅपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981) आणि द लास्ट एम्परर (1987) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन वेळा हा पुरस्कार जिंकलेल्या तीन हयात व्यक्तींपैकी ते एक आहेत .
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1688790)
आगंतुक पटल : 141