संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचालनात 321 शालेय विद्यार्थी आणि 80 लोककलावंत होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2021 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
येत्या 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दिल्लीतल्या चार शाळांचे विद्यार्थी आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पूर्व क्षेत्रीय संस्कृती केंद्र, कोलकाता इथले लोककलावंत सहभागी होणार आहेत. यासाठी, संरक्षण मंत्रालय आणि दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाने 401 विद्यार्थी आणि कलावंतांची निवड केली आहे. यात 271 मुली आणि 131 मुलांचा समावेश आहे. DTEA उच्च माध्यमिक शाळा दिल्ली, माउंट अबू पब्लिक स्कूल रोहिणी, विद्या भारती शाळा, माध्यमिक सरकारी कन्या शाळा या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात पूर्व क्षेत्रीय संस्कृती केंद्र, कोलकाता इथल्या लोककलावंतांची निवड करण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत : माउंट अबू पब्लिक स्कूल आणि विद्या भारती शाळेची संकल्पना आत्मनिर्भर भारत असून, यात 38 मुले आणि 54 मुली सहभागी होणार आहेत.
माध्यमिक सरकारी कन्या शाळेच्या 102 विद्यार्थिनी, “हम फिट, तो इंडिया फिट” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुरु केलेल्या ‘फिट इंडिया’मोहिमेपासून प्रेरणा घेत हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
DTEA उच्च माध्यमिक शाळेचे 127 विद्यार्थी पारंपरिक वेशात तामिळनाडू राज्यातले लोकनृत्य सादर करतील.
कोलकात्याच्या पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे 80 कलावंत ओडिशा कालाहांडी येथील बजसाल लोकनृत्य सादर करतील.
आज माध्यमांसमोर झालेल्या पूर्वावलोकनादरम्यान युवा विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे आणि राजपथावर मान्यवर अतिथींसमोर आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे, आशी प्रतिक्रिया या सर्वांनी व्यक्त केली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुले आणि लोककलावंतांची संख्या 400 पर्यंत कमी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 600 पेक्षा जास्त विद्यार्थी व कलावंत या सोहळ्यात सहभागी झाले होते.
Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1688392)
आगंतुक पटल : 192