दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या पुनरूज्जीवन योजनेला केंद्रीय मंत्रिमडळाने मान्यता दिल्यानंतर  वर्षभरामध्ये  ‘ईबीआयटीडीए’ मध्ये सकारात्मक वृद्धी

Posted On: 11 JAN 2021 11:11PM by PIB Mumbai

 

पाच वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या पुनरूज्जीवनाची योजना तयार करण्यात आली. त्यानुसार संस्थेच्या कर्मचा-यांचे वेतन, प्रशासन, आणि इतर लाभ यांच्यावर खर्च करण्याची क्षमता सन 2014-15 मध्ये 672 कोटी रुपये होती त्यामध्ये वाढ होऊन 2015-16 मध्ये 3,855 कोटींपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आणखी काही अडचणींवर मात करून पुनरूज्जीवनाच्या पॅकेजनंतर बीएसएनएल पुन्हा एकदा नफा कमविणारी संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

भारत सरकारने सार्वजनिक सेवेतल्या व्यवसायांना वित्तीय पाठबळ देण्यासाठी बीएसएनएलचे पुनरूज्जीवन करण्यासाठी कटिबद्धता दर्शवून पॅकेज मंजूर केले होते. याविषयी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये लोकसभेत प्रश्नोत्तराच्यावेळी स्पष्ट सांगितले होते की, ‘‘आम्ही बीएसएनएलचे पुनरूज्जीवन करणार असून तिला नफ्यात आणण्यात येईल.’’

पुनरूज्जीवन योजना तयार केल्यानंतर वर्षभरामध्येच बीएसएनएल आणि एमटीएनएल यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ईबीआयटीडीएमध्ये सकारात्मक वाढ दिसून येत आहे.  या आर्थिक वर्षात 2019 सप्टेंबरमध्ये संपलेल्या पहिल्या सहा महिन्यात उणे 3596 कोटी ताळेबंद असताना, त्यामध्ये 602 कोटी रुपयांची सकारात्मक वाढ झाली आहे. तर याच काळामध्ये एमटीएनएलची आकडेवारी उणे 549 कोटी रूपये असताना  त्यामध्ये 276 कोटी रुपयांची सकारात्मक वाढ झाली आहे. दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019-20 च्या तुलनेत दोन्ही संस्था आपली तूट 50टक्के कमी करतील, असा अंदाज आहे.

ऐच्छिक सेवानिवृत्ती योजनेमुळे बीएसएनएचे जवळपास 50 टक्के आणि एमटीएनएलचे 75 टक्के मनुष्यबळ कमी झाले आहे. त्याचबरोबर बीएसएनएलने  आपल्या इतर खर्चातही कपात करून महसूल कायम ठेवण्यात सक्षम झाले आहे. बीएसएनएलने एफटीटीएच म्हणजेच फायबर-टू-द-होम यांची जोडण्यांचा विस्तार वेगाने केला आहे. या संपूर्ण कामाकडे दूरसंचार विभागाकडून अतिशय बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर मोबाइल क्षेत्रातही ऑक्टोबर 2020 मध्ये बीएसएनएलचा मार्केट शेअर वाढून 10.36 टक्के झाला आहे, यासंबंधी टीआरएआयने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. बीएसएनएलने नव्याने 10 दशलक्ष ग्राहकसंख्या वाढवली आहे.

बीएसएनएलने आपले टॉवर मालमत्ता भाड्याने देवून  निधी उभारला आहे. यामार्गाने गेल्यावर्षी 1018 कोटी रुपयांची कमाई केली. आणि आता हे भाड्याने मिळणारे उत्पन्न सुरक्षित करण्यासंबंधी विचारही केला आहे.

भारतीय मोबाइल बाजारपेठेत आता फक्त चारच कंपन्या आहेत. त्यापैकी तीन कंपन्या खाजगी क्षेत्रातल्या आहेत आणि बीएसएनएल/ एमटीएनएल एकमेव सार्वजनिक क्षेत्रातली संस्था आहे.

-----

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687933) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil