माहिती आणि प्रसारण मंत्रालय

51 व्या इफ्फीसाठी बांगलादेश-कंट्री इन फोकस

Posted On: 10 JAN 2021 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2021


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यावर्षीच्या "कंट्री इन फोकस"साठीच्या देशाचे नाव आज जाहीर करण्यात आले. 51व्या इफ्फीसाठी बांगलादेश-कंट्री इन फोकस राहणार आहे.

कंट्री इन फोकस हा महोत्सवातला विशेष विभाग असून त्या देशाचे चित्रपट क्षेत्रातले योगदान आणि या क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल यामध्ये घेण्यात येते. 51व्या इफ्फीमध्ये या विभागात चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

1) तन्वीर मोकम्मल यांचा जीबोन्धुली

2) झहिदूर रहीम अंजान यांचा मेघमल्लार

3) रुबैयात होसेन यांचा अंडर कस्‍ट्रक्‍शन

4) सिन्सिअरली युअर्स, ढाका या नुहाश हुमायून, सईद अहमद शौकी,राहत रहमान जॉय, एमडी रोबीउल आलम, गोलम किब्रिया फारुकी, मीर मुकर्रम होसेन, तन्वीर एहसान, महमुदुल इस्लाम, अब्दुलाह अल नूर, कृष्णेदू चटोपाध्याय, सय्यद सालेह अहमद शोभन यांच्या चित्रपटाचा यात समावेश आहे.


* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687582) Visitor Counter : 168