युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज येथे 162 खाटांच्या वसतिगृहाचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2021 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज डॉ. करणी सिंह शुटींग रेंजच्या आवारात निवासी वसतिगृहाचे उद्घाटन केले. हे 162 खाटांचे वातानुकुलीत वसतिगृह असून प्रत्येक खोलीमध्ये प्रसाधनगृह आहे. येथील भोजन विभागात देखील वातानुकूलन सुविधा असून क्रीडा प्रकारांच्या आवश्यकतेनुसार विशिष्ट आहार तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र करमणूक विभाग देखील आहे. या सुविधा केंद्रासाठी 12.26 कोटी रुपये खर्च केले आहेत.

किरेन रिजिजू म्हणाले, “आपले खेळाडू ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा , राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा प्राप्त होतील अशी जीवनशैली उपलब्ध करून दिली पाहिजे.” तज्ञ समिती द्वारे सुविधा व्यवस्थापनासह अन्न, आदरातिथ्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत सर्व वसतिगृहे किमान 3 तारांकित दर्जाची असणे आवश्यक असल्याचेही क्रीडामंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

रिजीजू म्हणाले, “नेमबाजी हा सध्याचा एक प्रमुख खेळ आहे, आम्हाला आमच्या नेमबाजांकडून खूप अपेक्षा आहेत आणि देशात तळागाळातील स्तरावर प्रतिभेचा मोठा साठा आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी आपले सर्वाधिक नेमबाज पात्र आहेत.”

या वसतीगृहामुळे, याआधी शुटींग रेंजच्या बाहेर राहणाऱ्या नेमबाजांना आता या आवारातच राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भारतीय नेमबाजी प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.नेमबाजांना आता आपापल्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन आणण्यासाठी जास्त लांब जावे लागणार नाही.

S.Kane/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1686943)
आगंतुक पटल : 178