अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 2020-21 चे जीडीपीचे अग्रिम अंदाजपत्रक केले जारी
Posted On:
07 JAN 2021 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज 2020-21 वर्षासाठी जीडीपीचे पहिले अग्रिम अंदाजपत्रक (एई) प्रसिद्ध केले. वर्ष 2020-21 मध्ये वर्ष 2011-12 च्या किंमतीच्या तुलनेत वास्तविक जीडीपीमध्ये 7.7 टक्के आणि किरकोळ जीडीपीत 4.2 टक्क्यांनी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
एनएसओच्या तिमाही अंदाजानुसार, 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत वास्तविक जीडीपीमध्ये 15.7 टक्क्यांनी घट झाली आहे. तिमाही आधारानुसार आर्थिक वर्ष 2020-21 ची पहिली तिमाही ते आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत वास्तविक जीडीपीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष 2020-21 च्या अंदाजपत्रकात तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने वर्षअखेर भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 7.7 टक्क्यांनी कमी राहील. लॉकडाऊन नंतरच्या काळात अर्थव्यस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येक तिमाहीतील निरंतर वाढीमुळे देशाची आर्थिक मुलतत्वे मजबूत राहिली आहेत.
S.Kane/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686932)
Visitor Counter : 170