अर्थ मंत्रालय

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडून महत्त्वपूर्ण असे ‘मुक्त अधिकृत आर्थिक प्रचालक’पॅकेज

Posted On: 07 JAN 2021 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

कोविड परिस्थितीमुळे उद्‌भवलेल्या सध्याच्या कठीण काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनी निभावलेली भूमिका लक्षात घेऊन सीबीआयसी म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने त्यांच्यासाठी नवा कार्यक्रम सुरु केला आहे. लिबरलाईज्ड एमएसएमई एईओ पॅकेज असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

एमएसएमई उद्योगांनी एईओ म्हणजेच अधिकृत आर्थिक प्रचालक होऊन विविध लाभ मिळवावेत या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीबीआयसीने काही पात्रता निकष शिथिल केले आहेत. संबंधित मंत्रालयाचे वैध प्रमाणपत्र असणाऱ्या एमएसएमई उद्योगांनाच तसे शिथिल निकष लागू होतील. यानुसार, एका वर्षात किमान दहा सीमाशुल्क मंजुरीपत्रे भरलेल्या आणि दोन वर्षांपेक्षा अधिक काळ अनुपालन (compliance) योग्य तऱ्हेने करणाऱ्या एमएसएमई उद्योगांना सदर योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी असेल. यासाठी आवश्यक कागदपत्रांविषयीही बऱ्यापैकी सुलभता बहाल करण्यात आली आहे. 'एईओ-श्रेणी एक' करिता मंजुरीसाठी आलेल्या अर्जावर केवळ पंधरा दिवसात निर्णय देण्याची वचनबद्धताही सीबीआयसीने व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त बँकेत ठेवण्याच्या तारणाविषयी आणखी शिथिलता देण्यासारखे अन्य लाभही एमएसएमई उद्योगांना देण्यात येणार आहेत.

या लिबरलाईज्ड एमएसएमई एईओ पॅकेजच्या माध्यमातून सर्व पात्र एमएसएमई उद्योगांना अधिक जलद सीमाशुल्क मंजुरी आणि तत्सम इतर लाभ मिळवण्यासाठी सीबीआयसी प्रोत्साहन देत आहे.

 

S.Kane/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1686924) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu