संरक्षण मंत्रालय

विमानातून सोडता येऊ शकणा-या ‘सहायक-एनजी’ मालवाहू पेटीची पहिली हवाई चाचणी यशस्वी

Posted On: 30 DEC 2020 10:41PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या सहायक-एनजीया विमानातून खाली सोडता येऊ शकणा-या स्वदेशी पेटीची पहिली यशस्वी चाचणी आज केली. भारतीय नौदलाच्या आयएल 38 एसडी या विमानातून गोव्यात सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आली.

भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी या पेट्यांचे संशोधन करण्यात आले आहे. या पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येईल, यावर संशोधन करण्यात आले. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला. यामुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किना-यापर्यंत यावे लागणार नाही.

सहायक-एनजी च्या विकास प्रक्रियेमध्ये विशाखापट्टणमची एनएसटीएल आणि आग्रा येथील एडीआरडीई या दोन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. सामान वाहून नेणा-या पेट्या तयार करण्यासाठी मेसर्स ॲवंटेल उद्योगाने भागीदारी केली आहे. सहायक-एनजीची आधुनिक आवृत्ती सहायक एमके 1 काढण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये जीपीएस म्हणजे वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची 50 किलो वजन -वहन क्षमता आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

आजची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी डीआरडीओच्या संशोधकांचे, भारतीय नौदलाचे आणि यामध्ये सहभागी असलेल्या उद्योगांचे   अभिनंदन केले.

-----

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1685035) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi