इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सरकारी संस्थांच्या 24 डिजिटल प्रशासन उपक्रमांना 7 श्रेणीअंतर्गत आज राष्ट्रपतींकडून डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 वितरित

Posted On: 30 DEC 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2020

 
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी  नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि विज्ञान भवनसह भोपाळ, चेन्नई, कोलकाता आणि पटना अशा अनेक ठिकाणांहून सहभागी झालेल्या आभासी पुरस्कार सोहळ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान केले.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सर्व 24  विजयी संघांचे अभिनंदन केले आणि कोविड-19 महामारीच्या काळात सरकारी सेवा आणि कामकाजात सातत्य राखण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वितरणात विशिष्ट तंत्रज्ञानासह देश समृद्ध करण्यासाठी विविध स्तरावरील अधिकारी व तांत्रिक चमूने बजावलेल्या  भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, डिजिटल इंडिया पुरस्कारांमध्ये  नागरिकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्याची आणि भारताला डिजिटल महासत्ता बनवण्याची सरकारची सर्वांगीण संकल्पना  प्रतिबिंबित होते.  “कोरोना विषाणूने  सामाजिक संबंध, आर्थिक क्रियाकलाप, आरोग्य सेवा, शिक्षण आणि जीवनातील इतर अनेक बाबी.संदर्भात जगात बदल घडवून आणला  आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. गतिशीलता-निर्बंधाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी भारत केवळ सज्जच  नव्हता तर संकटाचा उपयोग विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी म्हणूनही केला. अलिकडच्या काळात  डिजिटल पायाभूत सुविधा बळकट  केल्यामुळेच हे शक्य झाले.“ असे त्यांनी नमूद केले .

ते पुढे म्हणाले की तंत्रज्ञानाच्या प्रगतीला बर्‍याचदा ‘व्यत्यय’ म्हणून संबोधले जाते, परंतु यावर्षी तिने आपल्याला  मोठ्या प्रमाणात संकट दूर करण्यास मदत केली. सरकारसाठी देखील, माहिती तंत्रज्ञान हे नागरिकांना विविध सेवा पुरवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची चाके फिरती राहण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण साधन होते. सक्रिय डिजिटल हस्तक्षेपामुळे आपण लॉकडाउन काळात महत्त्वपूर्ण सरकारी सेवांचे परिचालन सातत्य सुनिश्चित करू शकलो. .

ते म्हणाले, “माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात डिजिटल समावेशकता आली. इंटरनेट, इंटरनेट बँकिंग किंवा युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआयद्वारे आपण सहज भरणा करू शकतो."

एनआयसीच्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रपती म्हणाले, एनआयसी हा देशातील ई-प्रशासन आणि डिजिटल परिवर्तनाचा मार्गदर्शक आहे. सरकार आणि नागरिकांमध्ये अखंड आणि अडथळामुक्त संवाद साधण्यासाठी हे तंत्रज्ञान-आधारित अनेक उपक्रम राबवत आहे.”

नाविन्यपूर्ण नागरिक-केंद्री डिजिटल उपायांची रचना आणि अंमलबजावणी आणि सर्व नागरिकांचे राहणीमान सुधारल्याबद्दल सरकारी संस्थांच्या 22 डिजिटल प्रशासन उपक्रमाना 6 श्रेणीअंतर्गत आज राष्ट्रपतींकडून डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आले. आरोग्यसेतु आणि ईऑफिस यांना परीक्षकांची  पसंती  अंतर्गत पुरस्कार देण्यात आले.

 

Category

Winners

1

Innovation in Pandemic

eSanjeevani – National Telemedicine Service

COVID-19 Sample Collection Management System

Aapda Sampoorti Portal

Pravasi Shramik and Rojgar Setu Portal

2

Excellence in Digital Governance - MINISTRY / DEPARTMENT (Central)

eCommittee Supreme Court of India, Department of Justice

Department of Posts

Department of Fertilizers

Department of Land Resources

3

Excellence in Digital Governance - STATE / UT

Haryana

Tamil Nadu

Uttar Pradesh

West Bengal

4

Excellence in Digital Governance - DISTRICT

Khargone, Madhya Pradesh

Changlang, Arunachal Pradesh

Kamareddy, Telangana

5

Open Data Champion

Health Sector Data on OGD Platform India

The Indian Council of Agricultural Research (ICAR)

Food Corporation of India (FCI)

Ministry of Micro, Small & Medium Enterprises (MSME)

6

Exemplary Product

Port Community System PCS1x - National Maritime Single Window

ServicePlus - A metadata-based Service Delivery Platform

Integrated Temple Management System - ITMS

7

Jury's Choice

ArogyaSetu

eOffice

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684861) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil