अंतराळ विभाग
भारत आणि भूतान यांच्यामध्ये बाह्य अंतराळाच्या शांततापूर्ण वापरातील सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
30 DEC 2020 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये भारत आणि भूतान यांच्यामध्ये बाह्य अंतराळाच्या शांततापूर्ण वापरातील सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. यासंदर्भात दि. 19 नोव्हेंबर, 2020 रोजी बंगलुरू /थिंपू येथे करार करण्यात आला होता.
तपशील:
या सामंजस्य करारामुळे भारत आणि भूतान उपग्रह दूरसंप्रेषण आणि उपग्रह आधारित जलवाहतूक सेवा, अंतराळ विज्ञान आणि ग्रह संशोधन , अंतराळयानाचा उपयोग आणि अंतराळ प्रणाली तसेच भूस्थित प्रणाली, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी सहकार्य करण्यात येणार आहे.
संयुक्त कार्यकारी समूह स्थापन करून त्याव्दारे सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संयुक्त समूहामध्ये विज्ञान विभागाचे आणि इस्रो तसेच भूतानच्या माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाचे सदस्य असणार आहेत. या समूहाच्या माध्यमातून निश्चित कालमर्यादेत कार्यक्षेत्राचा आराखडा तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
अंमलबजावणीची रणनीती आणि लक्ष्य:
उभय देशात स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार विशिष्ट क्षेत्रांनुसार अंमलबजावणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी संयुक्त कार्यसमूह स्थापन करणे, कार्यवाहीच्या मुद्यांविषयी नियोजन करण्यात येणार आहे.
मुख्य प्रभाव:
या सामंजस्य करारामुळे उपग्रह क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. उपग्रहाव्दारे संप्रेषण, उपग्रहाव्दारे दिशादर्शन, अंतराळ विज्ञान आणि बाह्य अंतराळाविषयी संशोधन करण्यात येणार आहे.
लाभार्थींची संख्या:
भारत आणि भूतान यांच्यामध्ये झालेल्या या सामंजस्य सहकार्य करारामुळे अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक उपक्रम राबविणे, विकसित करणे शक्य होणार आहे. त्याचा या दोन्ही देशांना, विभागाला तसेच प्रदेशालाही लाभ होणार आहे.
पृष्ठभूमी:
अंतराळ क्षेत्रात भारत आणि भूतान यांच्यामध्ये औपचारिक सहकार्य स्थापन करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. यासाठी आंतर-सरकारी सामंजस्य कराराचा आराखडा नोव्हेंबर 2017 मध्ये तयार करण्यात आला. या आराखड्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या व्दिपक्षीय बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार्य प्रस्तावाविषयी चर्चा झाली.
उभय देशांच्या राजनैतिक स्तरावर संवाद-चर्चा झाल्यानंतर सामंजस्य कराराचा व्यावहारिक मसूदा तयार करण्यात आला. त्याला उभय देशांनी मान्यता देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात आली. या मसुद्याला उभय देशांनी मान्यता दिल्यानंतर दि. 19 नोव्हेंबर, 2020 रोजी भारत आणि भूतान यांनी सामंजस्य करार करून त्याची देवाण-घेवाण केली.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684763)
Visitor Counter : 197
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam