अर्थ मंत्रालय

प्राप्तीकर विभागाच्या वतीने दिल्लीमध्ये तपास मोहीम

Posted On: 29 DEC 2020 8:52PM by PIB Mumbai

 

प्राप्तीकर विभागाच्यावतीने दिल्ली क्षेत्रामध्ये हवाला व्यवहारांमध्ये गुंतलेल्या आणि बेहिशेबी रोकड बाळगून नगदी व्यवहार करणा-या अनेक मंडळींचा शोध घेऊन जप्तीची कारवाई केली.

या तपास कारवाईमुळे बनावट खरेदी आणि विक्रीची बिले तयार करून बोगस संस्थांच्या नावाने त्यांचा वापर होत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर बँकांमध्येही अशाच बोगस संस्थांच्या नावे खाते उघडून बेहिशेबी निधी जमा केला जात असल्याचे लक्षात आले. अशा बोगस संस्था  दोन महिन्यात बंद करून पुन्हा तशाच नवीन संस्था स्थापन करून गैरव्यवहार केला जात असल्याचे पुरावे  या तपास मोहिमेमध्ये निदर्शनास आले आहेत.

अशा प्रकारे सुमारे 300 कोटींपेक्षा जास्त रकमेची खरेदी आणि विक्रीची बनावट बिले तसेच इतर कागदपत्रांचे पुरावे सापडले आहेत.

प्राप्तीकर खात्याच्यावतीने आज टाकलेल्या छाप्यांमध्ये बेहिशेबी 14 कोटी रुपये रोकड आणि दोन कोटींचे सोने-चांदी जप्त करण्यात आले.

या प्रकरणात पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

----

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684501) Visitor Counter : 185