संरक्षण मंत्रालय

‘आयएनएसव्ही बुलबुल’च्या माध्यमातून 23 ते 28 डिसेंबर 2020 कोची ते अंद्रोथ बेटापर्यंत नौकानयन मोहीम

Posted On: 24 DEC 2020 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2020

 

दक्षिण नौदलाच्यावतीने कोची ते लक्षव्दीपमधल्या अंद्रोथ बेटापर्यंत नौकानयन मोहीम आखण्यात आली आहे. यामध्ये मिनीकॉय बेटांच्या समुहापर्यंत नौकानयन करण्यात येणार आहे. कोचीच्या ऑफशोअर सेलींग क्लबच्यावतीने ही मोहीम आखली आहे. नौदलाच्या युवा कर्मचा-यांना साहसी मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच सागरी मैलाचे अंतर पार करताना नौकानयनातील कौशल्ये विकसित करण्याची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

या मोहिमेला 23 डिसेंबर, 2020 रोजी कोचीच्या नाविक तळावरून रिअर अॅडमिरल अँटनी जॉर्ज यांनी ‘आयएनएसव्ही बुलबुल’ला हिरवा झेंडा दाखवला. आयएनएसव्ही बुलबुल ही 40 फूटांची, एलसी-40 डिझाइनची शर्यतीसाठीची नौका (रेसिंग क्रूझर) आहे. जगभरामध्ये स्वतंत्रपणे सागरी प्रवासामध्‍ये वापर करण्यासाठी ही नौका सक्षम आहे. पुडुचेरीच्या मेसर्स अल्ट्रा मरीन याट प्रा. लिमिटेड या कंपनीने ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाच्या अंतर्गत ही नौका भारतात तयार केली आहे.

बुलबुल मोहिमेमध्ये सहा अधिकारी सहभागी झाले आहेत. अशियाई क्रीडा स्पर्धेत 22,000 सागरी मैल नौकानयन स्पर्धेत पदक विजेते कॅप्टन अतुल सिन्हा यांचाही या मोहिमेत सहभाग आहे. त्यांच्याबरोबरच इतर पाच कर्मचा-यांमध्ये दोन महिला अधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात वरिष्ठ असलेल्या रिअर अॅडमिरल आरती सरीन, दक्षिणी नौदलामध्ये वैद्यकीय अधिकारी सहभागी आहेत. साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी महिला अधिका-यांना प्रोत्साहित करण्यासाठी या दोन्ही महिला अधिकारी स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. लेफ्टनंट कमोडोर तुलिका कोटनाला या दुस-या सागरी नौकानयनामध्ये तज्ज्ञ असून त्या एटीसी अधिकारी आहेत. तुलिका कोटनाला यांनी अलिकडेच बंगालच्या उपसागरामध्ये 4500 सागरी मैल नौकावहन मोहिमेत कार्य केले आहे. त्याचबरोबर या मोहिमेत वरिष्ठ लेफ्टनंट अविरल केशव आणि ओजस कुलकर्णी, कॅप्टन यु एस चरण सहभागी होणार आहेत. यापैकी अविरल केशव आणि ओजस कुलकर्णी हे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या नौका जलप्रवास मोहिमेत सहभागी होत आहे. ही मोहीम दि. 28 डिसेंबर, 2020 रोजी कोची येथे संपणार आहे. या जलप्रवासात बुलबुल नौकेतून हे सहा नौदल अधिकारी 400 नाविक मैलाचे अंतर पार करणार आहेत.

* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683342) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Tamil