नागरी उड्डाण मंत्रालय
भारत आणि फिलीपिन्स दरम्यान सुधारित हवाई सेवा करारावर स्वाक्षर्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2020 6:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिलिपिन्स दरम्यान सुधारित हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.
सुधारीत हवाई सेवा करार हा दोन्ही देशांदरम्यानच्या नागरी हवाई वाहतुकीतील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान वर्धित आणि अखंड कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे तसेच दोन्हीकडील हवाई सेवांना व्यापारविषयक संधी प्राप्त होऊन सुरक्षा सुनिश्चित होईल. या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान अधिकाधिक व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण क्षेत्रातील विकासाला चालना मिळणार आहे.
***
M.Chopade/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1683031)
आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam