संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन
Posted On:
18 DEC 2020 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2020
सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च 2020 रोजी दिलेल्या निर्णयानुसार भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकाऱ्यांना स्थायी (पर्मनंट) कमिशन देण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2020 रोजी पूर्ण केली आहे. 80 एसएससी अधिकाऱ्यांना उपलब्ध जागा आणि गुणवत्ता यादीनुसार पर्मनंट कमिशन मंजूर करण्यात आले आहे. पर्मनंट कमिशन मिळालेल्या यादीत 41 महिला आणि 39 पुरुष अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681852)
Visitor Counter : 178