संरक्षण मंत्रालय

शौर्य चक्र पुरस्कार परत करण्याबाबतची बातमी द्वेषपूर्ण आणि संरक्षण दलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवण्याच्या उद्देशाने प्रेरित

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2020 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2020


प्रादेशिक भाषेतील एका वृत्तपत्राने 15 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या बातमीत असा दावा केला आहे की, शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी  25,000 शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांनी आपले पुरस्कार परत केले आहेत.

ही बातमी संपूर्णतः खोटी, पूर्णपणे निराधार आहे आणि दुर्भावनापूर्ण असून आपल्या संरक्षण दलांची प्रतिष्ठा, सन्मान आणि अभिमानाला हानी पोहचवण्याचा या बातमीचा हेतू आहे. खरं तर, 1956 ते 2019 दरम्यान 2,048 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहेत.

माध्यमांना सावधगिरी बाळगण्याचा, घटनेतील सत्यता पडताळून बघण्याचा आणि अशा खोट्या आणि द्वेषपूर्ण बातम्या प्रकाशित करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1680844) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Telugu