उपराष्ट्रपती कार्यालय
विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांसह मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांनी उद्योगांशी निकटचा संबंध स्थापन करणे आवश्यक - उपराष्ट्रपती
कॉर्पोरेट क्षेत्राला विद्यापीठ परिसरात उद्योजकता परिसंस्थेसाठी निधी पुरवण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे केले आवाहन
Posted On:
08 DEC 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी-उद्योजकता संबंध वृद्धिंगत करणे अत्यंत आवश्यक असल्यावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांसह मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांनी उद्योगांशी निकटचा संबंध स्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विशाखापट्टणम येथे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टीआयई ग्लोबल समिट -2020 ला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी विद्यापीठांना तरुणांमध्ये उद्योजकतेच्या कलागुणांना जोपासण्यासाठी इन्क्युबेशन केंद्रे स्थापन करण्याची सूचना केली. तसेच कॉर्पोरेट क्षेत्राला विद्यापीठ परिसरात उद्योजकता परिसंस्थेला निधी पुरवण्याचे आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
इंडस उद्योजक (टीआयई) ही सिलिकॉन व्हॅली स्थित ना नफा तत्त्वावरील संस्था आहे जी नेटवर्किंगच्या माध्यमातून स्टार्ट अपला मदत करते आणि त्याच्या या परिषदेत भारतात मोठी गुंतवणूक ”आणण्याच्या संधींबाबत माहिती दिली जाईल.
भारतातील लोकसंख्येमध्ये सुमारे 65 टक्के युवकांचा समावेश असल्याचे नमूद करून नायडू म्हणाले की प्रतिभावान तरूणांच्या विशाल ऊर्जेचा पूर्णपणे उपयोग व्हायला हवा आणि त्यांची मानसिकता रोजगाराच्या शोधाकडून रोजगार निर्मितीकडे वळायला हवी. महिलांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केली. देशात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची मोठी संधी आहे, असे सांगत टीईईने मार्गदर्शनाच्या माध्यमातून 50 हजार इच्छुक महिला उद्योजकांना घडवल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
भारताचे जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट-अप परिसंस्था असे वर्णन करताना नायडू यांनी नॅसकॉमचा हवाला दिला की टेक स्टार्ट अपपैकी जवळपास 50 टक्के स्टार्टअप्सना कोविड पूर्व पातळीपर्यंत महसूल जाईल असा विश्वास आहे. “ही निश्चितच आशादायी बातमी आहे आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळात संपूर्ण जग भारतीय स्टार्ट अपकडे वळेल.
उद्योजकता फक्त नफ्याशी संबंधित नाही आहे अधोरेखित करताना नायडू म्हणाले की शिक्षण, आरोग्य सेवा आणि मूलभूत मानवाधिकार यांच्या माध्यमातून लोकांचे जीवन अधिक चांगले बनविणे हा यामागील उद्देश आहे. “हे स्पर्धा आणि करुणा या दोन्ही गोष्टींना महत्व देणे आहे,” असे ते पुढे म्हणाले.
कोविड -19 महामारीने निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीला संधींमध्ये बदलण्याची ही वेळ आहे. तरुणांना नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येण्याचे आवाहन करताना अशी पर्यावरण प्रणाली तयार करण्याची इच्छा व्यक्त केली जी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांना आशादायक स्टार्ट-अपमध्ये बदलू शकेल.
आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीत उद्योजकता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते असे सांगून स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून सक्षम वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले. उद्योजकतेला चालना देणे म्हणजे केवळ योग्य आर्थिक धोरण तयार करणे किंवा सर्वोत्तम शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करणे नव्हे, तर संपूर्ण वातावरण निर्मिती करणे आहे ज्यात नावीन्य आणि कल्पना विकसित होतील. “जेव्हा उद्योजक यशस्वी होतात, तेव्हा ते केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी देखील आर्थिक संधी निर्माण करतात. ” असे ते पुढे म्हणाले.
जास्तीत जास्त तरुण लोक रोजगार बाजारपेठेत सामील होतील आणि 2030 पर्यंत जगभरात सुमारे दीड अब्ज नवीन नोकऱ्यांची गरज भासणार असल्याचे नमूद करून उपराष्ट्रपतींनी टीआयई सारख्या प्रस्थापित उद्योजक व वाणिज्य संस्थांनी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
उपराष्ट्रपतींनी नमूद केले की अशा परिषदा, कल्पना आणि ज्ञानांची देवाणघेवाण करण्यासाठी केवळ एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत नाहीत तर या उपक्रमासाठी नेटवर्क तयार करण्यात मदत करतात. या उपक्रमाबद्दल त्यांनी टीआयईची प्रशंसा केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, टीआयई हैदराबादचे अध्यक्ष श्रीधर पिन्नापुरेड्डी आणि टीआयई ग्लोबल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष महावीर शर्मा आदी मान्यवर या व्हर्च्युअल कार्यक्रमाला उपस्थित होते.
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679227)
Visitor Counter : 138