संरक्षण मंत्रालय

पूर्व हिंद महासागर प्रदेशात रशियन नौदल आणि भारतीय नौदल यांच्यात पॅसेज  सराव  (पॅसेक्स)

Posted On: 04 DEC 2020 9:23PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदल (आयएन) 4 ते 5 डिसेंबर 2020 दरम्यान पूर्व हिंद महासागर क्षेत्रात  (आयओआर) रशियन नौदलाबरोबर  पॅसेज सराव  (पॅसेक्स) करत आहे. या सरावात आरयूएफएन मार्गदर्शित क्षेपणास्त्र जहाज  वर्याग,, मोठ्या पाणबुडी विरोधी जहाजे  आणि मध्यम ओशन  टँकर पेचेंग यांचा समावेश आहे. . भारतीय नौदलाचे  प्रतिनिधित्व हेलिकॉप्टरसह स्वदेशी बनावटीची  मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट शिवालिक आणि  कदमत हे  पाणबुडीरोधी जहाज करत आहे.

या सरावाचा उद्देश आंतरपरिचालन वाढवणे, सामंजस्य  सुधारणे आणि मैत्रीपूर्ण नौदलांमधील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करणे हा असून उन्नत पृष्ठभाग आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती, शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप कवायती आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

परस्परांच्या बंदरांना भेटीदरम्यान किंवा समुद्रातील भेटीच्या  वेळी परदेशी मित्रदेशांमधील  नौदलाबरोबर भारतीय नौदल  नियमितपणे पॅसेक्सचे आयोजन करत आहे.   पूर्व हिंद महासागर प्रदेशात आयोजित हा सराव दोन्ही देशांमधील दीर्घकालीन  सामरिक संबंध आणि विशेषत: सागरी क्षेत्रातले  संरक्षण सहकार्य प्रतिबिंबित करतो.

4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाच्या नौदल दिनानिमित्त हा सराव आयोजित करण्यात आला आहे. हा पॅसेक्स सराव भारत-रशिया संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल. उत्तर हिंद महासागर प्रदेशात 4 ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत इंद्रा नेव्हीसारख्या द्वैवार्षिक  सरावाच्या माध्यमातून  या दोन्ही नौदलानी मजबूत संबंध निर्माण केले आहेत.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678447) Visitor Counter : 222


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil