पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

श्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुंतवणूकदार, विकासक आणि व्यवसायांना भारताच्या नवीकरणीय ऊर्जेच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी केले आमंत्रित


देशातील उर्जा क्षेत्रातील दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी भारत आपल्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या परिवर्तनाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर : मंत्री

Posted On: 28 NOV 2020 11:06PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुंतवणूकदारांना, विकसकांना आणि व्यवसायांना भारताच्या नवीकरणीय ऊर्जेच्या प्रवासात सहभागी  होण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यांना आश्वासन दिले आहे की हे अत्यंत फायद्याचे आणि परस्परपूरक उपक्रम असतील. आज तिसर्‍या री-इन्व्हेस्ट परिषद  2020 मधील समारोप भाषणात ते म्हणाले की नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारत जगासाठी  पसंतीचा  देश बनत आहे. मागील 6 वर्षात भारतात नवीकरणीय ऊर्जेसाठी 64 अब्ज  अमेरिकन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे.  नवीकरणीय उर्जेसह ऊर्जा क्षेत्रामध्ये भारताचे एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणुकीचे धोरण उदार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.  नवीकरणीय उर्जा-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी परकीय गुंतवणूकदार एकतर स्वतःहून गुंतवणूक करु शकतात किंवा आर्थिक किंवा तांत्रिक सहकार्यासाठी भारतीय भागीदारासमवेत संयुक्तपणे  उद्योग उभारू शकतातअसे ते म्हणाले.

देशांतर्गत व विदेशी गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी आम्ही सर्व मंत्रालयांमध्ये समर्पित प्रकल्प विकास कक्ष  (पीडीसी) आणि परदेशी थेट गुंतवणूक (एफडीआय) कक्ष स्थापन केले आहेत. कोविड साथीच्या आजाराच्या उद्रेकातून व्यवसाय आणि गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या चिंता सोडविण्यासाठी पुरेशा उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

प्रधान म्हणाले की भारतातील उर्जा क्षेत्रातील दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी भारत आपल्या उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे. आमचा उर्जा अजेंडा सर्वसमावेशक, बाजार-आधारित आणि हवामान संवेदनशील आहे असे मंत्र्यांनी नमूद केले.

प्रधान यांनी नवीकरणीय उर्जा क्षेत्र व्यापक करण्यासाठी भारतीय तेल आणि वायू उद्योगाने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या  अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला आणि ऱ्या क्षेत्रात गुंतवणूकीच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत असे सांगितले .

नैसर्गिक वायूवर आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या देशाच्या वन नेशन वन गॅस ग्रिडया आणखी एका प्रमुख परिवर्तनीय उर्जा उपक्रमाचा उल्लेख मंत्र्यांनी यावेळी केला.

प्रधान यांनी कंप्रेस्ड बायो-गॅस (सीबीजी) उपक्रमातील गुंतवणूकीच्या संधींकडे लक्ष वेधले.

प्रधान यांनी नमूद केले की गेल्या महिन्यात त चौथ्या भारतीय ऊर्जा परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या ऊर्जा धोरणांना पुढे घेऊन जाणाऱ्या सात प्रमुख सुकानुंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, 2030 पर्यंत 450 गीगा वॅट्स (जीडब्ल्यू) चे नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य साध्य करण्याव्यतिरिक्त, गॅस-आधारित अर्थव्यवस्था, जीवाश्म इंधनांचा स्वच्छ वापर, घरगुती इंधनासाठी जैविक  इंधनांवर अधिक अवलंबून राहण्यावर लक्ष केंद्रित करणे, विजेचे योगदान वाढविणे, हायड्रोजन सारख्या उदयोन्मुख इंधनांचा वापर करणे आणि सर्व ऊर्जा प्रणालींमध्ये डिजिटल नाविन्यास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

कोविड -19 ने आपल्या जीवनातील मूलभूत गृहीतांना आव्हान दिले असून उर्जा क्षेत्रात हरित क्रांतीच्या निकडांना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे असे मंत्री म्हणाले.

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676892) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu