भारतीय स्पर्धा आयोग
फ्यूचर समूहाच्या लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंग उपक्रमातल्या घाऊक व्यवसायाचे अधिग्रहण करण्यास रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडला भारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता
Posted On:
20 NOV 2020 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2020
सीसीआय म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआव्हीएल), रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडला (आरआरव्हीएल -डब्ल्यूओएस) फ्यूचर समूहाच्या लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंग उपक्रमातल्या घाऊक व्यवसायाचे अधिग्रहण करण्यासाठी मान्यता दिली आहे. हे अधिग्रहण स्पर्धा कायदा, 2002 कलम 31 (1 ) अनुसार होणार आहे.
फ्यूचर समूहातील कंपन्यांची फेररचना होणार असून आता रिलायन्स समूहाबरोबर एकत्रित होत असलेल्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत:-
फ्यूचर कन्झुमर लिमिटेड (एफसीएल);
फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड (एफएलएफएल);
फ्यूचर रिटेल लिमिटेड (एफआरएल);
फ्यूचर मार्केट नेटवर्क लिमिटेड (एफएमएनएल);
फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन लिमिटेड (एफएससीएसएल);आणि
फ्यूचरबाजार इंडिया लिमिटेड (एफआयएल); आणि तिच्या उपकंपन्या
( एकत्रित अधिग्रहित होत असलेल्या कंपन्या )
यामध्ये अनेक सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांचाही समावेश असून त्यात प्रामुख्याने घाऊक, किरकोळ आणि गोदाम व्यवसायातल्या कंपन्या आहेत. त्यांचे सर्व व्यवहार ‘संपूर्ण भारतभर असून त्यामध्ये खाद्य सामुग्री, किराणा माल, वस्त्रे, पादत्राणे आणि अशा इतर अनेक वस्तूंच्या किरकोळ व्यवसायाचा समावेश आहे.
या सर्व व्यवसायाचे हस्तांतरण आरआरव्हीएल आणि आरआरव्हीएल डब्ल्यूओएस या कंपन्यांकडे होणार आहे.
आरआरव्हीएल ही रिलायन्स उद्योग समूहामधील सूचीबद्ध नसलेली उपकंपनी आहे. किरकोळ पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. अन्नधान्य आणि किराणा माल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वस्त्र प्रावरणे, पादत्राणे आणि इतर सामुग्रीची विक्री करणारे संपूर्ण देशभरामध्ये आरआरव्हीएल करते.
आरआरव्हीएल डब्ल्यूओएसची संपूर्ण मालकी आरआरव्हीएलकडे आहे. रिलायन्स उद्योग समूहाने अलिकडच्या काळामध्ये अधिग्रहित केलेल्या विविध कंपन्यांच्या संयोजनाचे कामकाज आरआरव्हीएल डब्ल्यूओएसमार्फत केले जात आहे.
या अधिग्रहणसंबंधी स्पर्धा आयोगाच्या सविस्तर आदेशाचे पालन करण्यात येईल.
Jaydevi P.S./S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674519)