श्रम आणि रोजगार मंत्रालय

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिशाभूल करणार्‍या लेखावर ईपीएफओचे स्पष्टीकरण

Posted On: 19 NOV 2020 8:38PM by PIB Mumbai

 

श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत एक वैधानिक संस्था असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने  (ईपीएफओ)  म्हटले आहे की ऑक्टोबरमध्ये ईपीएफओ ग्राहक, कंपनींच्या नोंदणीत घट " या मथळ्याअंतर्गत  18.11.2020 रोजी माध्यमांच्या एका गटात  एक लेख प्रकाशित झाला होता. या संदर्भात, ईपीएफओने स्पष्टीकरण दिले आहे की लेखातील माहिती चुकीची आणि निराधार आहे.

ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर 2020 च्या तुलनेत  ईपीएफओकडे नोंदणीकृत आस्थापनांच्या संख्येत  30,800 ने घट झाली असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये  योगदान देणाऱ्या  1.8  दशलक्ष सदस्यांचीही घट झाल्याचा दावा या प्रकाशित लेखात केला आहे. ईपीएफओने म्हटले आहे की योगदान देणारे सभासद व आस्थापनांविषयी प्रसिद्ध केलेली माहिती ईपीएफओच्या अधिकृत आकडेवारीशी जुळत नाही . ही प्रकाशित केलेली माहिती ईपीएफओच्या आकडेवारीवर  आधारित  नाही आणि  चुकीची असल्याचे  ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

ईपीएफओच्या नोंदणीकृत  सदस्य आणि आस्थापना संबंधित अधिकृत माहिती दर महिन्याच्या 20 तारखेला पेरोल डेटाच्या स्वरूपात प्रकाशित केली जाते.  कोणत्याही वेतन महिन्याचा पेरोल डेटा ईसीआर भरण्यासाठी देय तारखेपासून एक महिन्यानंतर घेतला जातो. यामुळे सप्टेंबर, 2020 (देय तारीख 15.10.2020) साठी आकडेवारी 15.11.2020 नंतरच घेता येईल आणि ऑक्टोबर, 2020 (देय  तारीख 15.11.2020) साठी 15.12.2020 रोजी घेण्यात येईल.  20.10.2020  रोजी प्रकाशित पेरोल डेटा नुसार एप्रिल आणि मे 2020 वगळता ऑगस्ट 2020  पर्यंत निव्वळ वेतनवाढीमध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याचा ईपीएफओचा वेतनपट 20.11.2020  रोजी प्रकाशित केला जाईल.

ईपीएफओमध्ये, योगदान देणाऱ्या सदस्य आणि  आस्थापनांविषयीची माहिती आस्थापनांकडून कोणत्याही विशिष्ट वेतन महिन्यासाठी दाखल केलेल्या इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ईसीआर) मधून प्राप्त केली जाते. ईसीआर दाखल करण्याची अंतिम तारीख त्यानंतरच्या महिन्याची 15 तारीख असते. मात्र  नियोक्ता विलंब कालावधीसाठी व्याज भरून उशिरा  पैसे देऊ शकतो.

देय तारखेनंतरही ईसीआर दाखल करण्याच्या या लवचिकतेमुळे , कोणत्याही वेतन महिन्यासाठी ईपीएफओचा सहयोगी सदस्य आणि आस्थापना डेटा बदलत राहतो.  या संदर्भात, ऑक्टोबर 2020 साठी 16.11.2020 रोजी सदस्य आणि आस्थापनांची अंतिम संख्या काढणे  अकाली आणि पूर्णपणे चुकीचे आहे. "आकडेवारीचे बदलते स्वरूप लक्षात न घेता अज्ञात स्त्रोतांकडून अपूर्ण माहितीचा अंदाज वर्तवणे  आक्षेपार्ह आहे," असे ईपीएफओने नमूद केले आहे.

 

M.Chopade /S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674164) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu