अर्थ मंत्रालय

गुजरात इंटरनेशनल फायनान्स टेक-सिटी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरने डिपॉझिटरी रिसीपट्स सूचीबद्ध करण्यासाठी एक आराखडा जारी केला

Posted On: 28 OCT 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने गुजरात इंटरनेशनल फायनान्स टेक-सिटी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (जीआयएफटी आयएफएससी) मध्ये डिपॉझिटरी रिसीपट्स (डीआर) सूचीबद्ध करण्यासाठी नियम जारी केले आहेत. गिफ्ट आयएफएससी येथे अधिक आर्थिक उत्पादने आणि आर्थिक सेवांना विकसित करण्याचे उद्दीष्ट आहे.

नियम लागू केल्याने एफएटीएफ अंतर्गत सूचीबद्ध कंपन्यांना डिपॉझिटरी रिसीपट्स आणणे सोपे होईल तसेच या नियमामुलर पात्र कंपन्या भांडवल देखील वाढवू शकतात.

याव्यतिरिक्त, एफएटीएफ अंतर्गत सूचीबद्ध कंपन्यांना कोणत्याही एक्सचेंजवर आपल्या डीआर सूचिबद्ध करण्याबरोबरच स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करण्याची संधी मिळेल. कंपन्यांना हे करण्यासाठी, स्वतंत्र सार्वजनिक ऑफर आणण्याची गरज नाही. यामुळे कंपन्यांसाठी ट्रेंडिंगचा अतिरिक्त मार्ग निर्माण होईल.

याव्यतिरिक्त, आयएफएससीएने कंपन्यांसाठी प्रकटीकरण फ्रेमवर्क देखील जारी केले आहे. ज्यामध्ये कंपन्यांना संवेदनशील माहिती जसे की वित्तीय माहिती, उत्पादने किंवा किंमती, तसेच भागधारकांचे नमुने, डिपॉझिटरीमधील बदल आणि कॉर्पोरेट बदल ही माहिती दिली पाहिजे. तसेच, सूचीबद्ध कंपनी आपल्या क्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता ज्याप्रकारे पूर्ण करते त्याप्रकारे ही माहिती देणे आवश्यक आहे.

आयएफएसी स्टॉक एक्स्चेंजवर डीआर सूचीबद्ध करण्यासंदर्भात तपशीलवार माहिती आयएफएससीए च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे: https://www.ifsca.gov.in/Circular

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668269) Visitor Counter : 187