संरक्षण मंत्रालय
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी, यांच्या उपस्थितीत आयएनएस कवरट्टी नौदलात दाखल
Posted On:
22 OCT 2020 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2020
प्रोजेक्ट 28 ((कामोरता श्रेणी ) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आयएनएस कवरत्ती (पी 31),ही पाणबुडी रोधक युद्धनौका लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी, यांच्या उपस्थितीत आज विशाखापट्टनम येथील नौदल गोदीत झालेल्या एका समारंभात भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. व्हाइस ऍडमिरल अतुल कुमार जैन पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एफओसी-इन-सी), ईस्टर्न नेव्हल कमांड (ईएनसी), रियर ऍडमिरल विपिन कुमार सक्सेना (सेवानिवृत्त), मुख्य व्यवस्थपकीय संचालक , गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, कोलकाता (जीआरएसई), कोलकाता आणि इतर मान्यवरही या समारंभात उपस्थित होते. या कार्यक्रमात भारतीय नौदलाची संस्था , नेव्हल डिझाईन संचालनालय,यांची रचना असलेली आणि जीआरएसईद्वारे निर्मित चार एएसडब्ल्यू कॉर्वेटसमधील शेवटची युद्धनौका नौदलामध्ये दाखल झाली आहे.
लक्षद्वीप बेटा समूहाच्या राजधानीचे नाव दिलेल्या आयएनएस कवरट्टीचे बांधकाम भारतात उच्च स्तरीय डीएमआर 249 ए स्टीलच्या सहाय्याने केले गेले आहे. 109 मीटर लांबी आणि 14 मीटर रुंदी असलेले हे भव्य जहाज असून 3300 टन वजन नेऊ शकते . भारतात तयार करण्यात आलेली मजबूत पाणबुडी रोधक युद्धनौकांपैकी ही एक नौका आहे.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666857)
Visitor Counter : 271