कृषी मंत्रालय
महिला किसान दिवस साजरा
Posted On:
15 OCT 2020 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महिला किसान दिवस साजरा केला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, कृषी सचिव संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती.
पुरुषोत्तम रुपाला आणि यशस्वी महिला शेतकरी आणि महिला उद्योजक यांच्यादरम्यान संवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रगतीशील महिला शेतकर्यांच्या प्रेरणादायी कथा’ या ई-पुस्तकाचे आणि दोन व्हिडीओ चित्रफितींचे याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, महिला शेतकरी आणि महिला बचतगट ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी विकासात महत्वाची भूमिका निभावतात. देशभरातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला शेतकऱ्यांच्या प्रेरणादायक यशोगाथेचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यावर त्यांनी भर दिला. कृषी उत्पादनांचे गावपातळीवर मूल्यवर्धन करुन महिला बचत गट आणि पुरवठा साखळीमार्फत शहराकडे पुरवठा साखळी निर्माण करावी. तसेच मधमाशी पालन, मत्स्यपालन, पोल्ट्री, पशु संवर्धन यात महिला शेतकऱ्यांना मोठा वाव आहे आणि या क्षेत्रातील महिला केंद्री योजनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी विधेयकांमुळे ग्रामीण भागाला चालना मिळेल, असे कृषी सचिवांनी सांगितले.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664935)
Visitor Counter : 183