अर्थ मंत्रालय

अधिकृत व्यक्तींमार्फत बाजार प्रवेश

Posted On: 14 OCT 2020 9:41PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र प्राधीकरणाने (IFSCA) आयएफएससीमध्ये गुंतवणूक आधारीत विनिमय व्यवहाराची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि दुय्यम  बाजारातील तरलता वाढविण्यासाठी, त्याद्वारे बाजारविस्तार करण्यासाठी अधिकृत व्यक्तींद्वारे बाजार व्यवहारांसाठी नियामक चौकट जारी केली आहे.  

अधिकृत व्यक्ती ही व्यक्ती, भागीदारी संस्था, एलएलपी किंवा बॉडी कॉर्पोरेट जो शेअर ब्रोकरचा एजंट म्हणून बाजारात व्यापारी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचतो. 

आराखड्याअंतर्गत, शेअर बाजारातील स्टॉक ब्रोकर/ट्रेडिंग सभासद (आयएफएससीए किंवा सेबीकडे नोंदणीकृत किंवा दोन्हीकडे नोंदणीकृत) यांना परदेशी अधिकार क्षेत्रांमधील अधिकृत व्यक्तींमार्फत गुंतवणूकदारांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची परवानगी असेल.

आराखड्याविषयीची तपशील माहिती https://ifsca.gov.in/Circular  या आयएफएससीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664574) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu