निती आयोग
"इंडिया पीव्ही एज 2020" मधे सौर उत्पादनांवर धोरण रचनाकार करणार विचार व्यक्त
Posted On:
04 OCT 2020 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
भारतात उत्तम दर्जाच्या पीव्ही उत्पादनांच्या निर्मितिला चालना देण्यासाठी नीती आयोग, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि इनव्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने, दृकश्राव्य माध्यमाद्वारे दिनांक 6 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 5 ते 8:40 पर्यंत "इंडिया पीव्ही एज 2020" ही जागतिक परीषद आयोजित करण्यात आली आहे.
या परीषदेत नियोजन सत्र, तसेच वेफर आणि सेल्स, स्वयंपूर्णता आणि उत्पादन साधने आणि पुरवठा श्रृंखला या विषयांवरील सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.त्याचप्रमाणे यावेळी गुंतवणूकदारांसाठी पीव्ही उत्पादन निर्मिती याविषयावर एक बैठक होईल. या परीषदेत तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ही राज्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर गुंतवणूकदारांची एक गोलमेज बैठक होईल, ज्यात भारतातील सौर उत्पादन क्षेत्रासंदर्भातील बाबी, उदाहरणार्थ परवडण्यासारखी आर्थिक मदत, सौर उत्पादनांसंदर्भात अनुकूल वातावरण निर्माण करण्यात उत्पादकांची भूमिका यावर चर्चा आणि विचार विनिमय होणार आहे.
केंद्रीय उर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के.सिंग, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमितेश कुमार आणि इनव्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी दीपक बागला आणि नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल हे नियोजन सत्रात सहभागी होणार असून हा समारंभ दृकश्राव्य स्वरूपात होईल. सुमारे 60 उल्लेखनीय भारतीय आणि जागतिक कंपन्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यात दृकश्राव्य माध्यमाद्वारे यात सहभागी होणार आहेत.
2015 च्या पॅरीस करारात भारताच्या राष्ट्रीय विकास परीषदेच्या (NDC) असामान्य दूरदृष्टिचे, नेतृत्वाचे आणि वातावरण बदलांविरुध्द लढण्यासाठी लागणारी प्रतिभा, या प्रयत्नांचे सूतोवाच झाले होते. "इंडिया पीव्ही एज - 2020" हे ती आकांक्षा पूर्ण करण्याच्या द्रुष्टीने पुढचे पाऊल आहे.
जर आपणास या परीषदेत सादरीकरण करायचे असेल तर कृपया pvedge2020[at]gmail[dot]com यावर लेखी संपर्क साधावा.
जर आपल्याला या परीषदेत उपस्थित रहायचे असेल तर येथे नोंदणी करा:
https://www.investindia.gov.in/pv-edge-2020-registration
* * *
R.Tidke/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661529)
Visitor Counter : 147