पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि  राजस्थान मधील वायु प्रदूषण आणि पिकांचे खुंट जाळण्याच्या मुद्द्यांवर 01ऑक्टोबर रोजी  मंत्री स्तरीय बैठक


वायु प्रदूषण कमी करण्यासाठी जादूची कांडी नाही,  केंद्र, राज्य सरकार आणि नागरिकांनी या समस्येविरोधात लढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज - प्रकाश जावड़ेकर

Posted On: 29 SEP 2020 11:17PM by PIB Mumbai

उत्तरेकडील राज्यांमध्ये विशेषतः दिल्लीत थंडीच्या काळात वायू प्रदूषणाची वाढती पातळी अधोरेखित करत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले कि मानव निर्मित घटकांव्यतिरिक्त हवामान आणि भौगोलिक घटकांमुळे ही समस्या उद्भवते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी  केंद्र, राज्य सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून ही सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

There's no magic bullet for mitigation of #AirPollution .The factors are meteorological and geographical which gets exacerbated by man made factors every year during 2-3 months. Centre, Delhi govt.,neighboring states & citizens need to work in synergy. Its a shared responsibility pic.twitter.com/5j4PCwAZEK

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की यावर्षी दिल्ली आणि शेजारील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांसमवेत येत्या  01 ऑक्टोबरला आभासी बैठक होणार आहे.

वायु प्रदूषण की रोकथाम के लिए उठाये गए कदमो की समीक्षा, आगे की कार्यवाही में गति और समन्वय एवं पराली जलाने से होने वाले प्रदूषण से निपटने और अन्य सम्भंदित विषयो को लेकर पांच राज्यों (दिल्ली, राजस्थान, हरियाणा, यूपी और पंजाब)के साथ मंत्री स्तर की बैठक 1 अक्टूबर को होगी।@PMOIndia pic.twitter.com/8DmNeUewTn

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020

एखादी समस्या ओळखणे हे ती सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे नमूद करत जावडेकर म्हणाले कि वर्ष 2016 मध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी  'रियल टाइम एयर क्वालिटी इंडेक्स' ची सुरुवात केली होती. वायु प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने धोरणात्मक प्रयत्न निर्देशित करण्यात आणि प्रदूषणाचे हॉटस्पॉट ओळखण्यात याची मदत होईल. नवी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या समस्या ही हवामान विषयक कारणांशी संबंधित आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

हवेचा वेग आणि  मिश्रणाची उंची याचे  उत्पादन म्हणून परिभाषित केलेला वेंटिलेशन निर्देशांक दिल्लीच्या वायु गुणवत्तेवर परिणाम करणारा  महत्त्वपूर्ण घटक आहे. हिवाळ्यात  थंड, कोरडी हवा आणि जमिनीवरून कमी हवेच्या परिस्थितीचे वर्चस्व असते.  ज्यामुळे हवा स्थिर राहते आणि फैलावासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. हिवाळ्यादरम्यान भारताच्या उत्तरेकडून व उत्तर-पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा वाहतो ज्यामुळे शेवटी प्रदूषण आणि धुके यांचे मिश्रण होऊन  दिल्लीत धुके तयार होते.  स्थानिक आणि प्रादेशिक वायू प्रदूषण करणार्‍या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे तीव्रता आणखी वाढली आहे.

पर्यावरण मंत्री यांनी गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख केला ज्यात बदरपुर उर्जा प्रकल्प बंद करणे, सोनीपत उर्जा प्रकल्प बंद करणे, कमी प्रदूषण करणार्‍या बीएस -6 वाहनांची ओळख आणि इंधन मानके, दिल्लीत पेरिफेरल एक्सप्रेसवेचे जलद गतीने काम ,ई-वाहनांना अनुदान इ.समावेश आहे. 

प्रदूषण कम करने के लिए केंद्र सरकार ने कई पहल की हैं जैसे बदरपुर, सोनिपत पॉवरप्लांट बंद किया, 15 साल से रुका पेरिफेरल एक्सप्रेस वे पूरा किया। BS-VI वाहन, BS-VI तेल उपलब्ध कराया। Construction and Demolition Waste rule लाए, इलेक्ट्रिकल वाहनों को सब्सिडी सहित कई कदम उठाए। pic.twitter.com/pIuSwuBBJH

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660199)