उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी आरोग्यपूर्ण जीवन क्रमासाठी  ‘दिनचर्या’ आणि ‘ऋतुचर्या’ या संकल्पनांचे अनुसरण करण्याची सूचना केली


खाजगी- सार्वजनिक भागीदारी या नमुन्यात आधुनिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागात उभारण्याची खाजगी क्षेत्राला सूचना

Posted On: 29 SEP 2020 11:06PM by PIB Mumbai

 

दैनंदिन व्यवहारासाठी दिनचर्यातर ऋतूप्रमाणे व्यवहारासाठी ऋतुचर्याया संकल्पना आपण अनुसरलेल्या पाहिजेत असे प्रतिपादन करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  निरोगी शरीर आणि निरोगी मन याचे महत्व  राखण्यावर आज भर दिला.

कोविड पश्चात आरोग्यविश्व - नवीन आरंभया विषयावरील FICCI HEAL च्या चौदाव्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून ते बोलत होते. महामारीने आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने   आरोग्यपूर्ण रहाणीचे महत्व शिकवले असे सांगत, आरोग्य आणि संतुलित आहार दोन्हीच्या सहाय्याने आजारपण दूर ठेवता येते असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

बैठी जीवनशैली ही  देशातील वाढत्या असांसर्गिक आजाराला मुख्यत: जबाबदार आहे; असे नमूद करत त्यांनी लोकांना जागच्या जागी धावणे, धावणे, भराभर चालणे, एरोबिक्स यासारख्या शारीरिक हालचालींसाठी दिवसातील काही वेळ राखून ठेवण्याची सूचना केली.

आजारावर लस येण्याच्या दृष्टीने नजीकच्या भविष्यात सकारात्मक बातमी मिळेल अशी आशा व्यक्त करत नायडू यांनी लोकांना मुखपट्ट्या लावणे, अंतर राखणे आणि नियमितपणे हात धुणे हे निर्बंध पाळण्याचे आवाहन केले.

कोविडच्या लढाईत पुढे असणारे आरोग्य सेवक तसेच बाधित रुग्ण यांच्याशी भेदभावाचे तसेच घृणा व्यक्त होण्याचे काही प्रसंग घडले. अश्या प्रसंगाची निंदा करून उपराष्ट्रपतींनी अशा प्रकारचे वर्तन हे योग्य नाही आणि अशा प्रवृत्ती मुळापासून काढून टाकल्या पाहिजेत असे सांगितले. कोविड बाधित असणाऱ्या किंवा त्याच्या जवळपास असणाऱ्या कोणालाही भेदभावपूर्ण वागवण्य़ाची वृत्ती नसावी. त्यांच्याबाबतीत सहवेदना आणि सकारात्मक भावना यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.

जागोजागी आणि सर्वांना परवडणारी उत्तम दर्जाची आरोग्य केंद्रे जागोजागी असायला हवीत असे ते म्हणाले. खाजगी क्षेत्राने पुढे येऊन सार्वजनिक-खाजगी सहभागातून पावले टाकत ग्रामीण भागात   विशेषतः दूरस्थ आणि दुर्गम जागी अशा पद्धतीची आधुनिक आरोग्य केंद्र सुविधा द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले.

महामारीचे मानसिक सामाजिक परिणाम जगभरातच झाल्याचे सांगून ते म्हणाले वयोवृद्ध, त्यांची काळजी घेणारे, मानसिक रुग्ण आणि काठावरील समाज यांच्या मानसिक व सामाजिक पैलूंकडे खास लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

महामारिशी चाललेल्या लढाईत सरकारला सहाय्यकारी ठरणार्‍या FICCI सभासदांचा उल्लेख करतलढ्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि उपाय यांचा लाभ सदस्यांनी करून दिल्याचे सांगितले. कोविड वरील उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास स्वास्थ्यहे टेलीमेडिसीन व्यासपीठ विकसित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

लीपफ्रॉगींग टू डिजिटल हेल्थकेअर सिस्टीम: रिइमेजिंग हेल्थकेअर सिस्टिम फॉर एवरी इंडियन”   या नावाच्या. FICCI BCG च्या अहवालाचे त्यांनी विमोचन केले

FICCI अध्यक्ष डॉक्टर संगीता रेड्डी,  FICCI  हेल्थ केअर सर्विस कमिटी अध्यक्ष  डॉ आलोक रॉय, FICCI  हेल्थ केअर सर्विस कमिटी सह-अध्यक्ष डॉक्टर हर्ष महाजन आणि अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

****

B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660195) Visitor Counter : 259