संरक्षण मंत्रालय

संरक्षण उद्योगातल्या सहयोगात्मक भागीदारीसाठी कंबोडिया समवेत वेबिनार आणि प्रदर्शनाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 25 SEP 2020 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020

 

भारत आणि कंबोडिया यांनी  आज एका वेबीनारचे आयोजन केले होते. सहयोगात्मक भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची  जागतिक मजल या विषयावरच्या हा वेबिनार संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने एसआयडीएम द्वारे आयोजित केला होता.

संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी आणि येत्या पाच वर्षात  5 अब्ज डॉलर्स  संरक्षण निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांसमवेत  आयोजित करण्यात येत असलेल्या वेबिनार मालिकेचा भाग म्हणून हा  वेबिनार  आयोजित करण्यात आला.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कंबोडीयाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेबिनार मध्ये सहभागी झाले. दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी यावेळी चर्चा झाली. इलेक्ट्रोनिक आणि टेलीकम्युनिकेशन यंत्रणा, सुरुंगापासून संरक्षण देणारी वाहने, सुरूंग निकामी करणारी साधने  या वेबीनार मध्ये दाखवण्यात आली.

 वेबिनारला 200 पेक्षा अधिक प्रतिनिधींची उपस्थिती होती आणि प्रदर्शनासाठी 100  आभासी स्टॉल्स लावण्यात आले होते.

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659225) आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil