जलशक्ती मंत्रालय
संसदेने कामगार सुधारणा विधेयक मंजूर केल्याबद्दल श्री रतन लाल कटारिया यांच्याकडून कौतुक, स्वातंत्र्यानंतर देशातील कामगार कायदा प्रथमच बदलणार, असे म्हणाले
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कामगार आणि कामगारांच्या हितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्न केली पूर्ण – श्री रतन लाल कटारिया
Posted On:
23 SEP 2020 8:25PM by PIB Mumbai
संसदेत तीन कामगार कायदा विधेयके मंजूर केल्याबद्दल जल शक्ती आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रतन लाल कटारिया यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कामगार मंत्री श्री संतोष गंगवार यांचे अभिनंदन केले. श्री रतन लाल कटारिया, यांनी केंद्रिय मंत्री संतोष गंगवार यांची लोकसभेत भेट घेतली आणि या घटनेबद्दल सरकारचे अभार मानले आहेत. श्री कटारिया म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत कामगार कायद्यात बदल होत असल्याचे प्रथमच घडत आहे. ही विधेयके मंजूर केल्यानंतर, ५० कोटी कामगार आता सामाजिक सुरक्षिततेच्या कक्षेत येतील. हा कायदा कामगारांना केवळ सामाजिक सुरक्षितता प्रदान करणार नाही तर या पुढे व्यवसायात देखील क्रांतिकारी बदल घडवून आणेल.
पंतप्रधानांप्रति धन्यवाद व्यक्त करतांना, श्री कटारिया म्हणाले की, भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हितासाठी आवाज उठविला होता आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. आंबेडकरजींचे स्वप्न पूर्ण करीत आहेत.
ते पुढे म्हणाले की, आता हे विधेयक संमत झाल्यानंतर संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील कामगारांना विविध प्रकारच्या सुविधा मिळू शकणार आहेत. या विधेयकांमध्ये, केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा निधीची तरतूद केली आहे, ज्याचा उपयोग असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणार आहे. आता या पुढे सर्व कामगारांना नियुक्ती पत्र देणे देखील बंधनकारक राहणार आहे.
केंद्रिय मंत्री रतन लाल कटारिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला नव्या दिशेने नेत आहेत, ज्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांसाठी नवीन लोककल्याणकारी कायदा बनविले जात आहेत.
****
B.Gokhale/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658369)