शिक्षण मंत्रालय

शिक्षण पर्व अंतर्गत उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण विषयावर राष्ट्रीय वेबिनार

Posted On: 23 SEP 2020 8:04PM by PIB Mumbai

उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्या वतीने आज ` उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण` विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्र यामध्ये परिवर्तनवादी सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत सरकारने अलिकडेच जाहीर केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे. शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ८ सप्टेंबर २०२० पासून `शिक्षक पर्व`चा एक भाग म्हणून वेबिनारची मालिकेचे आयोजन केले जात आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे अध्यक्ष (संशोधन) प्रा. राकेश मोहन जोशी, निति आयोगाचे संचालक श्री अलोक मिश्रा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी संचालक प्रा. आय. के. भट्ट , एसएएसटीआरए अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. वैद्य सुब्रमण्यम आदी वेबिनारचे आमंत्रित वक्ते होते. यूजीसीच्या आंतरराष्ट्रीय सहकार सहसचिव डॉ. मंजू सिंह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

भारताचे प्राचीन आणि समृद्ध शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे प्रा. राकेश मोहन जोशी म्हणाले. आपला जागतिक पातळीवरील प्रसार वाढविण्यासाठी एचईआयएस (हायर एज्युकेशन इन्फर्मेशन सिस्टिम) यांनी  एकाच व्यासपीठावर समन्वित प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला.
श्री अलोक मिश्रा यांनी तपशीलवार सादरीकरणात आंतरराष्ट्रीयीकरणाचे दिशादर्शक आणि रणनितीची गणना केली. भारतातील उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी, श्री मिश्रा यांनी जागतिक स्तरावरील विद्यापीठांच्या परिसंस्थांवर, देश – विदेशात सांस्कृतिक संस्थाबद्ध वचनबद्धता आणि आंतरराष्ट्रीयीकरण यावर लक्ष केंद्रित केले.
आंतरराष्ट्रीयीकरणाकडे नेण्यासाठी धोरणात आपली संसाधने एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या गरजेला डॉ. एस.वैद्य सुब्रमण्यम, यांनी अधोरेखित केले. पूर्णपणे प्रत्यक्ष उपस्थिती, सहकार्याद्वारे आणि ऑनलाइन शिक्षणाचे माध्यम या तीन पद्धतींद्वारे परदेशी शिक्षण संस्था भारतात प्रवेश करू शकतात असे  डॉ. वैद्य सुब्रमण्यम यांनी सांगितले.
उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाशी संबंधित चिंता दूर करण्यासाठी कार्यबल गठित करण्याच्या महत्त्वावर प्रा. आय. के. भट्ट यांनी भर दिला. प्रा. भट्ट यांनी पुढे आंतरराष्ट्रीयीकरणाच्या कार्यपद्धतीच्या गरजेला या निमित्ताने अधोरेखित केले. डॉ. सिंह यांनी वेबिनारमधील समृद्धता सारांशित करताना, समर्पित पोर्टलवरील अधिकृत माहितीसंग्रहावर भर दिला, क्रेडीट हस्तांतरण सुलभ करणे, दुहेरी, संयुक्त पदवी, दोन पदव्या, एचईआयची स्वायतत्ता आणि मंजुरी प्रक्रियेची सुलभता संबोधित करणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्यासाठी सुलभ आणि सुव्यवस्थित प्रवेश प्रक्रिया, सर्व एचईआय साठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे कार्यालय यावर भर दिला.
शिक्षण, आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योग आणि उच्च शिक्षण संस्था या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. सहभागींपैकी कित्येकांनी तज्ज्ञांच्या सादरीकरणावर आपली निरीक्षणे देखील नोंदविली.


M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658350) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil